Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीसातारच्या बैलजोड्या करणार माऊली तुकोबांच्या रथाचे सारथ्य

सातारच्या बैलजोड्या करणार माऊली तुकोबांच्या रथाचे सारथ्य

सातारा : श्री संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले असून सदर दोन्ही पालखी रथ यांसाठी सातारा येथील प्रसिद्ध बैल व्यापारी वर्षापूर्वी ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजू गिरी यांच्या मार्फत दिलेल्या बैलजोड्या सारथ्य करणार आहेत. संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी बैलजोडीचा मान बाबुराव चिंधु विधाते यांना मिळाला असून सदर बैल जोडी विधाते यांनी पुसेगाव बैल बाजार येथून राजू गिरी यांच्यामार्फत घेतलेली आहे. त्यातील एक बैल कर्नाटक येथील खरेदी केला असून दुसरा बैल फडतरवाडी येथील बुवा जाधव यांच्याकडून गिरी यांनी खरेदी करून दिलेला आहे. यावेळी नाना जाधव कवठे यांचे त्यांना सहकार्य लाभले तसेच तुकाराम महाराज रथाचे दुसरे मानकरी श्री रवींद्र बाळू कोंढरेपाटील यांनासुद्धा राजू गिरी यांनी नागठाणे येथील नलावडे यांच्याकडून बैलजोडी खरेदी करून दिलेली आहे. विधाते व कोंढरे हे यावर्षीचे तुकाराम महाराज रथाचे बैल जोडी चे मानकरी आहेत. तसेच संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठीचा यावर्षीचा बैलजोडीचा मान पंडित कृष्णाजी रानवडे यांना मिळाला असून त्यांनी सदर बैलजोडी राजू गिरी यांच्यामार्फत खरेदी केलेली आहे त्यावेळी गिरी यांना माऊली अण्णा ताकवणे व राहुल चिताळकर पाटील यांचे सहकार्य लाभले ही बैलजोडी आळंदी ते पंढरपूर माऊलींच्या रथाचे सारथ्य करणार आहे . विशेष म्हणजे गतवर्षी सुद्धा राजू गिरी यांना माऊली व तुकोबारायांच्या रथासाठी घुंडरे व कड यांना बैलजोडी देण्याचे भाग्य लाभले होते.
यावर्षीसुद्धा माऊली व तुकोबांची दुहेरी सेवा करण्याचा मान मिळाल्यामुळे गिरी कुटुंबांमध्ये तसेच शाहूपुरी परिसरामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular