सातारा : शाासनाचे सार्वजनिक आरोग्य सुविधा सर्वसामान्यांसाठी फार महत्वाची आहे,अशी आरोग्य सेवा पुरवण्यासाठी शासन चांगले पैसे मोजत असतानाही, वैद्यकीय अधिकारी वेळेवर आणि जागेवर उपस्थित नसतील तर त्यांनी सरळ घरी बसलेले केव्हाही चांगले, अश्या शब्दात खरडपट्टी काढताना, आरोग्य सेवा पुरवताना उपकाराची नव्हे तर सेवेची भावना ठेवा, सर्वसामान्यांना जी काही उपलब्ध असेल ती आरोग्य सेवा चांगल्या पध्दतीने द्या अन्यथा तुमच्यावर शासनामार्फत कारवाई करायला भाग पाडू अश्या कडक शब्दात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी रहिमतपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील संबंधीताना चांगलेच फैलावर घेतले.
पुसेगांव येथील रथोत्सवानिमित्त आज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे पुसेगांव मध्ये आले होते, त्यानंतर ते रहिमतपूर येथे जाणार होते. अभेरी घाटमध्ये मोटरसाइकल चा अपघात झाला होता. उदयनराजेंनी जखमी महिलेला तातडीने बरोबरच्या वाहनामध्ये पुढील उपचारासाठी रहिमतपुर प्राथमिक आरोग्य केन्द्रामध्ये पाठवले . रहिमतपूर येथे आल्यावर प्राथमिक आरोग्य केंद्रावर त्यांना गर्दी दिसली. त्या अनोळखी महिलेला प्रा.आरोग्य केंद्रात वैद्यकीय उपचाराकरता पाठविले.
प्राथमिक आरोग्य केंद्रावर झालेली गर्दी आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजेंना प्राथमिक आरोग्य केंद्रात पाहुन, केंद्रावर उपस्थित असणा-या स्टाफची चांगलीच तारंाबळ उडाली, अनुपस्थित असलेल्या वैद्यकीय अधिका-यांना फोन लावून बोलावण्यात आले. तोपर्यंत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे त्याठिकाणी गर्दीने उपस्थित असलेल्या आजारी व्यक्तींची आस्थेवायीकपणे चौकशी करीत होते. या चौकशीत प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी वारंवार अनुपस्थित असतात, वेळेवर कधीच आरोग्य सेवा मिळत नाही, अश्या तक्रारी करीत होते. तक्रारी अक्षम्य असल्याने, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजेंनी तातडीने वैद्यकीय अधिका-यांना बालावण्याच्या सूचना केल्या. सहाव्वा वेतन आयोग पाहीजे, सातवा वेतन आयोग पाहीजे, मात्र आरोग्यसेवेचे महत्व कळत नाही का 1 वैद्यकीय शिक्षण घेताना पहिल्याच वर्षी जी शपथ घेतली जाते ती शपथ विसरलात का अश्या कठोर शब्दात कान उघाडणी करताना, जिल्हयातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वेळेवर आणि योग्य सुविधा मिळाल्याच पाहिजेत, मुख्य कार्यकारी आधिकारी, जिल्हा आरोग्य अधिका-यांचे याकडे लक्ष नाही का, आणि लक्ष नसेल तर जिल्हा आरोग्य अधिका-यांवर शासनामार्फत कारवाई करायला भाग पाडले जाईल अश्या खरमरीत शब्दात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी संबंधीतांची चांगलीच कान उघाडणी केली.
दरम्यान, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केलेल्या आस्थेवाईक चौकशी मुळे उपस्थित आजारी व्यक्ती व त्यांचे नातेवाईक भारावून गेले होते. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या अचानक एन्ट्रीमुळे संबंधीत वैद्यकीय अधिका-यांची बोबडी वळााशी तर कामचुकार व्यक्तींची गाळण उडाली.