Wednesday, June 25, 2025
Homeठळक घडामोडीखा. उदयनराजे यांच्या प्रयत्नातून 1 कोटी 61 लाखांचा निधी मंजूर

खा. उदयनराजे यांच्या प्रयत्नातून 1 कोटी 61 लाखांचा निधी मंजूर

सातारा : सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातुन रस्ते विकास निधी, खासदारांचा स्थानिक विकास निधी, जिल्हा नियोजन समिती आदी विविध मार्गाने विकासकामांचा धडाका सुरु आहे, या पार्श्‍वभुमीवर राज्य शासनाच्या 2515 या लेखाशिर्षाखाली दुस-या टप्यात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मुळे, सातारा जिल्हयातील 13 ठिकाणी एकूण रुपये 1 कोटी 61 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, मंजूर करण्यात आलेल्या कामांचे आदेश आज ग्रामिण विकास मंत्रालयामधुन निर्गमित झाले आहेत. आठ दिवसापूर्वीच याच लेखाशिर्षाखाली याकामी ना.पंकजाताई मुंडे-पालवे यांचे विशष सहकार्य लाभले. राज्याच्या 2515 लेखाशिर्षाखाली 25 कामांसाठी रुपये 3 कोटी 50 लाखांचा निधी, मंजूर करण्यात आला आहे. आज अखेर 2515 मधुन 5 कोटी 11 लाखांचा भरघोस निधी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातुन जिल्हयाच्या विकासाकरीता प्राप्त झाला आहे. याकामी जलमंदिर पॅलेस येथून दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात पुढे नमुद केले आहे की, सातारा जिल्हयात विविध ठिकाणी मोठया प्रमाणात विविध योजनांच्या माध्यमातुन विकास कामे सुरु आहेत. लोकोपयोगी विकास कामे मार्गी लावण्यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे सातत्याने आग्रही असतात,त्यांच्या वेगवान पाठपुराव्यामुळे, तसेच ग्रामिण विकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांच्या आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा असलेला विशेष जिव्हाळा, यामुळेच खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केलेल्या शिफारशी ग्रामिण मंत्रालयाने महाराष्ट्र राज्याच्या 2515 या लेखाशिर्षामधुन, दुस-या टप्यात सातारा जिल्हयात एकूण 13 ठिकाणी एकूण 1 कोटी 61 लाखांचा भरघोस निधी मंजूर झाला आहे.
अधिक माहीती देताना प्रसिध्दीपत्रकात नमुद केले आहे की, 1 कोटी 61 लाखांचा निधी मंजूर करणेकामी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी कामांची शिफारस करुन, ना.पंकजाताई मुंडे यांचेशी दूरध्वनीवरुन चर्चा केली, शिक्षण व अर्थ समितीचे माजी सभापती सुनील काटकर यांचा सातत्याचा पाठपुरावा, तसेच याकामी बाळासाहेब खरात, संग्राम बर्गे, शफी इनामदार,पंचायत समितीचे माजी सदस्य प्रवीण धस्के,सुनील बर्गे, बाळासाहेब इथापे यांनी योग्य ते सहकार्य केल्यामुळे,़एकूण दोन टप्यात 5 कोटी 61 लाखांची विविध विकास कामे एकूण 38 ठिकाणी मंजूर करण्यात आल्याचे दोन स्वतंत्र आदेश ग्रामिण विकास मंत्रालयाने निर्गमित केले आहेत.
सदरची विकास कामे आचारसंहितेच्या कचाटयात सापडु नयेत यासाठी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी संबंधीत अधिका-यांना सूचना केल्या असल्याने, आचारसंहितेपूर्वी सदर कामांचे कार्यादेश दिले जावून, लोकोपयोगी कामे मार्गी लागतील असे प्रसिध्दीपत्रकात नमुद करण्यात आले आहे.दरम्यान, राज्याच्या लेखाशिर्षामधुन कामे मंजूर करण्यात आली असल्याने, ग्रामस्थ नागरिकांमध्ये खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या कार्यक्षम व वेगवान कार्यशैलीबद्यल समाधान पसरले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular