Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीउदयनराजेंनी गुढीपाडव्याच्या जनतेस दिल्या शुभेच्छा

उदयनराजेंनी गुढीपाडव्याच्या जनतेस दिल्या शुभेच्छा

सातारा : मराठी नववर्षाच्या प्रारंभानिमित्त येथील जलमंदिर पॅलेस येथे गुढी उभारून आणि गुढीचे पूजन करून खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी सांस्कृतिक परंपरा जपली. तसेच जनता जनार्दनास शुभेच्छा देत सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवोत आणि इडा पीडा टळो बळीचे राज्य येवो, अशी प्रतिक्रियाही व्यक्त केली.
यावेळी राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले व विविध मान्यवरही उपस्थित होते. गुढीपाडवा हा सण भारतीय संस्कृतीतील एक आदर्श परंपरा असून अंधारावर प्रकाशाचे, पापावर पुण्याचे आणि असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे. नववर्षाचा प्रारंभ आणि निसर्गातील बदल, वसंत ऋतूचे आगमन यामुळे सर्वत्र चैतन्यदायी वातावरण तयार होत असते. अगदी त्याचप्रमाणे सर्व जनतेच्या जीवनात सुखाचे दिवस यावेत, अश्या शब्दात खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्यातील नागरिकांसह सर्वांनाच गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular