कोडोली : सातारा लोकसभेचे आघाडीचे उमेदवार खा. उदयनराजे भोसले यांना प्रचंड मताधिक्क्याने विजयी करावे, असे आवाहन आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केले.
अमरलक्ष्मी येथील मंगलमुर्ती मगलकार्यालयात आयोजित केलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी सारंग पाटील, वनिता गोरे, पं. स. सभापती मिलींद कदम, जि. प. सदस्या अर्चना देशमुख, रवि साळुंखे, रामदास साळुंखे, अमोल लांगडे, दादा तांगडे, मनोज गायकवाड, राजू भोसले, गीतांजली कदम, सुनिल काटकर, अनिल खराडे, तेजस शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. शिंवेंद्रराजे म्हणाले, खा. उदयनराजे यांनी गेल्या 10 वर्षात प्रत्येक तालुक्यातील वाडी वस्तीमध्ये खासदार फंडातून विकासकामे केली आहेत. तरी आपआपसातील मतभेद विसरुन त्यांना चांगल्या मताने निवडणून द्यावे. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन जि. प. सदस्या अर्चना देशमुख यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
आघाडीचे उमेदवार खा. उदयनराजे भोसले यांना प्रचंड मतांनी विजयी करा : आ. शिवेंद्रराजे
RELATED ARTICLES