सातारा : बंदिस्त भुयारी गटार योजना, कास तलाव उंची वाढविण्याच्या कामाबरोबर आदी विविध कामाच्या शुभारंभ नियोजनासाठी आणि स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सातारा पालिकेने सहभाग घेतला आहे. त्या दृष्टीने अधिकारी वर्गाने कारभारात गतिमानता आणावी अशा सूचनाही त्यांनी केल्या. सातारा विकास आघाडीचे अध्यक्ष खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी अधिकारी वर्गाला केल्या. बैठकीला नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि एकाही सभापतीला प्रवेश दिला नाही.
पालिकेच्या शिवाजी सभागृहत सर्व विभागतील प्रमुख अधिकार्यांच्या बैठकीचे नियोजन केल्याने भंबेरी उडाली होती. बैठकीला एकाही नगरसेवकाला प्रवेश दिला नाही. पालिकेत खा. उदयनराजेंनी कोणालाही पूर्व कल्पना न देता पालिकेत प्रवेश केल्याने
पदाधिकारी आणि अधिकारी अवाक झाले. शहरातील भुयारी गटारी आणि कास बंदिस्त योजनेचे काम फेब्रुवारीमध्ये शुभारंभ करायचा आहे. सुमारे एक तास फक्त अधिकारी वर्गाशी चर्चा करून कामासंदर्भात सूचना करून कारभारात गतिमानता आणा. यापुढे कामात हलगर्जीपणा चालणार नाही. मला कामांचा रिझल्ट पाहिजे. मी कोणाचेही काही ऐकणार नाही असे खडेबोल खासदारांनी सुनावले.