सातारा : राष्ट्रवादी,काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे सातारा लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार खा.श्री.छ.उदयनराजे भोसले यांच्या निवडणूक प्रचारार्थ आज सकाळी सातारा शहर पदयात्रा काढण्यात आली.
चिमणपूरा पेठेतील गारेचा गणपती मंदिरापासून या पदयात्रेस प्रारंभ झाला , सुरुवातीला गणपती मंदिरात खा.श्री.छ.उदयनराजे भोसले व आमदार श्री.छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते श्रींचे पूजन करण्यात आले. त्यांनतर नगराध्यक्षा माधवी कदम , माजी नगराध्यक्ष अशोकराव मोने, माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम, अच्चूतराव जाधव, आदींच्या हस्ते श्रीफळ वाढवून पदयात्रेचा प्रारंभ करण्यात आला.
गारेचा गणपती मंदिरापासून प्रारंभ झाल्यावर प्रभाग क्रमांक 15, 16, 17, 19, व 20 मध्ये ठीक ठिकाणी मुख्य मार्गावरून ही पदयात्रा मार्गस्थ होत होती.
माजी नगराध्यक्षा रंजना रावत,स्मिता घोडके, माजी नगराध्यक्ष डॉ. अच्चूत गोडबोले, निशांत पाटील, नासीर शेख, उपनगराध्यक्ष सुहासराजे शिर्के , राष्ट्रवादीचे नेते सुधीर धुमाळ, पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकर , अमोल मोहिते, रवींद्र ढोणे, राजू गोडसे आदींसह आजी माजी नगरसेवक व विविध संस्था संघटनेचे प्रतिनिधिंनी या पदयात्रेत सहभाग घेतला होता.
चिमणपूरा पेठ, मनामती चौक, मंगळवार तळे, विठोबाचा नळ, सोहनी गिरण, काशीविश्वेश्वर मंदिर, डफळे हौद, खंडूजी कदम निवासस्थान , गोलमारुती मंदिर चौक , सोमवार पेठ दत्त मंदिर चौक , मार्गे फुटका तलाव परिसरात या पदयात्रेची सांगता झाली.
गोल मारुती चोवकात माजी उपनगराध्यक्ष दीपाली गोडसे व यादोगोपाल पेठेतील महिलांनी फटाक्यांऐवजी गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्यांची उधळण करून या पदयात्रेचे पर्यावरणपूरक स्वागत केले.
आजच्या या पदयात्रेत सुजाता राजमहाडिक, दीपलक्ष्मी नाईक, लीना गोरे, स्नेहा नलावडे, लता पवार , अनिता घोरपडे, सुनीता पवार, मनीषा काळोखे, बाळासाहेब खंदारे, रवींद्र पवार, दिंगंबर भोसले, शकील बागवान, महेश महाडिक , कुमार चावरे , प्रशांत अहिरराव , भाऊ चौगुले , अन्वर पाशा खान, प्रताप शिंदे आदींसह आजी माजी नगरसेवक, प्रमुख कार्यकर्ते, यांचाही सहभाग होता.
ठिकठिकाणी पदयात्रेचे नागरिकांनी उत्स्फुर्तपणे स्वागत केले. तसेच प्रचंड बहुमताने खा.श्री.छ.उदयनराजे भोसले यांना देण्याचा निर्धार व्यक्त केला.
उदयनराजेंच्या प्रचारार्थ सातारा शहरातून पदयात्रा उत्साहात
RELATED ARTICLES