सातारा : शारीरिक तंदुरुस्तीसाठी जगभरात आबालवृद्ध जागरुक बनले आहेत. संगणकीय बदलामुळे व स्पर्धेच्या जीवनशैलीमुळे अनेकांच्या आरोग्यावर परिणाम दिसून येत आहेत. याला लोकप्रतिनिधी अपवाद नाहीत. सातारा लोकसभा मतदारसंघाचे खा.श्री. छ. उदयनराजेही यांनीही आपल्या शरीर संपदाची काळजी घेण्यास सुरुवात केली आहे.पहिल्यांदा मॉर्निंग वॉक सुरू केले आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जिकण्याची हॅटट्रिक करून सुध्दा त्यांनी अंगावर गुलाल घेणे टाळले आहे. दुष्काळी भागातील शेतकरी व ग्रामस्थांची पाण्यासाठी धडपड पाहून त्यांनी हा निर्णय घेतला असल्याची चर्चा सुरू झाली होती. कोणी मदत केली?कोणी गद्दारी केली? याच्या खोलात खासदार पडले नाहीत. हे या कृतीतून दिसून आले आहे.
सतराव्या लोकसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसून भाजपचे सरकार केंद्रात आले आहे. संसदेत नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी होत आहे. अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सातार्यातील खासदार म्हणून श्री. छ. उदयनराजे भोसले यांची जबाबदारी वाढली आहे.याची त्यांना त्यांचे खरे हितचिंतक यांनी जाणीव करून दिली. त्यानंतर उदयनराजे यांनी ट्रॅक पॅन्ट व टी शर्ट परिधान करून सकाळी मौर्निग वॉक ला सुरुवात केली आहे. याचा सुखद धक्का त्याच्या चाहत्यांना बसला आहे. गेली आठ वर्षे उदयनराजे सातार्यात झालेल्या
हिल मॅरेथॉन तसेच इतर धावणी स्पर्धांना हिरवा झेंडा दाखवित होते. परंतू ते कधीही या स्पर्धांमध्ये प्रत्यक्षात सहभागी झाले नव्हते.भरधाव वेगाने गाडी चालविणे, गाणी मोट्या आवाजात ऐकणे असे रूप सातरकरांनी अनेकदा पाहिले आहे. पण, राजे, चक्क मॉर्निंग वॉक ला पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सातारचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार व उदयनराजे यांचे चुलत भाऊ आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले हे व्यायाम करणे बाबत आघाडीवर राहिले आहेत. धावणे, चालणे तसेच सायकलिंगच्या माध्यमातून सातार्यात त्यांचा मोठा मित्र परिवार बनला आहे. आमदार जयकुमार गोरे,आ. शशिकांत शिंदे, माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकरही,जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, राजकीय विविध पक्षातील नेते,सामाजिक कार्यकर्ते,डॉक्टर, व्यापारी व हौशी खेळाडू गेली काही दिवसापासून नियमित व्यायाम करीत असतात.काहींनी स्वतःच्या बंगल्यात खास जिम ची व्यवस्था केली आहे. मात्र, सातारा लोकसभा मतदारसंघाचे खा.श्री. छ. उदयनराजे यांनी कधी ही जिम बीम ची भानगड केली नाही. नैसर्गिकरित्या त्यांना राजबिंडे रूप लाभले असले तरी आता त्यांना शरीराची काळजी घेणे आवश्यक ठरू लागले आहे.आतापर्यंत सकाळी चालताना, पळताना, व्यायाम करताना खासादर कोणालाही दिसले नाहीत. मात्र, लोकसभा निवडणूकीत मताधिक्य कमी झाल्याचे दिसून आले आहे. ग्रामीण भागातील वाड्यावस्तीला भेट देणे गरजेचे होते पण, त्याच्या पायाला दुखापत झाल्याने त्यांना जाता आले नाही. आता निवडणूक निकालानंतर पार त्यांनी शारीरिक तंदुरुस्तीवर लक्ष केंद्रित केले आहे. दररोज सकाळी लवकर उठून ते सातारा व पुणे येथे वेळ मिळाल्या नंतर सहा ते आठ किलोमीटर अंतर मौर्निंग वॉक करीत आहेत.आपले राजकीय वजन वाढल्याची व जबाबदारी आल्याची जाणीव झाली आहे. शारीरिक वजन मात्र कमी करण्याचा निर्णय उदयनराजेंनी घेतल्यामुळे त्यांचे कुटुंबीय व जवळच्या मित्र परिवारांना आनंद झाला आहे. खा. श्री. छ. उदयनराजे यांची स्टाईल महाराष्ट्रात लोकप्रिय बनली आहे. त्यांचे अनेक फॉलोअर आहेत. आता मॉर्निंग वॉक साठी किती त्यांचे चाहते सकाळी लवकर उठून वॉक ला जातात? हे पाहणे उत्सुकतेचे ठरले आहे.
खा. श्री.छ. उदयनराजे यांनी सुरू केले पहिल्यांदा मॉर्निंग वॉक
RELATED ARTICLES