Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीउमेश सुतार यांना नॅशनल युनिटी अवॉर्ड जाहीर

उमेश सुतार यांना नॅशनल युनिटी अवॉर्ड जाहीर

कराड: आदर्श फौंडेशनचे वतीने दिला जाणारा नॅशनल युनिटी अवॉर्ड पत्रकार उमेश सुतार यांना जाहीर झाला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष विजय लोहार यांनी दिली.
पुरस्कार वितरण 30 जानेवारी रोजी कोल्हापूर येथे शाहू स्मारक याठिकाणी जेष्ठ चित्रपट अभिनेते भालचंद्र कुलकर्णी जेष्ठ प्रसार माध्यम तज्ञ डॉ विश्वास मेहेंदळे भूमाता ब्रिगेड अध्यक्षा तृप्ती देसाई यांचेसह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.
उमेश सुतार हे गेली 20 वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असून त्यांच्या कार्याचा गौरव अनेक सामाजिक संस्थांनी वेळोवेळी केलेला आहे. त्यांना यापूर्वी आदर्श पत्रकार, कवीरत्न, आदर्श ग्रंथपाल, समाज गौरव, आदर्श उपसंपादक, महात्मा गांधी तंटामुक्त शांतता पुरस्कार, कमल आई काव्य पुरस्कार यासारख्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. या निवडीबद्दल सुतार यांचे दैनिक ग्रामोध्दारचे उपसंपादक एकनाथ थोरात तसेच सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular