Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीउपमुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या आश्‍वासनानंतर मोहिते कुटुंबियांचे उपोषण मागे

उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या आश्‍वासनानंतर मोहिते कुटुंबियांचे उपोषण मागे

फलटण : प्रलंबित सिंचन विहीर अनुदान प्रश्नी तरडगाव ता.फलटण येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर लाभार्थी छाया मोहिते व त्यांचे पती किसनराव मोहिते यांचे आमरण उपोषण हे आठ दिवसापर्यंत सुरु होते.उपोषणाच्या आठव्या दिवशी उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपोषण स्थळाला भेट देऊन दोन महिन्याच्या आत संबधित अधिकारी यांची विभागीय स्तरावर चौकशी केली जाईल असे लेखी आश्वासन दिले यानंतर मोहिते कुटूंबियांनी सदर उपोषण मागे घेतले.
2011 रोजी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत विहीर मंजूर झाली होती.त्या विहिरीचे अनुदान अद्याप ही मिळालेले नाही तसेच अनुदान मिळणे बाबत प्रशासन यांच्याकडून कोणत्या ही प्रकारचे न्यायिक सहकार्य मिळाले नाही.
म्हणुन शेवटचा पर्याय मोहिते दांपत्य यांनी आमरण उपोषण करणे हाच निवडला होता. उपोषण करणे हाच निवडला होता. मोहिते दांपत्य यांच्या उपोषणा बाबतची बातमी प्रकाशित केली होती. सदर बातमीची दखल घेत उपोषणाच्या आठव्या दिवशी स्वत: उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपोषण स्थळाला भेट दिली. यावेळी चर्चेदरम्यान जे ठरले त्यानुसार एका अर्जाद्वारे मोहिते यांनी दिलेल्या जबाबाला पुढील कारवाई ही विभागीय स्तरावर केली जाईलअसे आश्वासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले.त्यामुळे मोहिते कुटूंबियांनी हे उपोषण मागे घेतले.
तत्पूर्वी भेटीच्या आदल्याच दिवशी ज्या तरडगावच्या तत्कालीन ग्रामसेवक सी.बी. तारु यांच्या चुकीच्या कारभारामुळे मोहिते कुटुंब यांना जो सर्वच त्रास सहन करावा लागतो आहे.त्यांच्याच निलबंनाची मागणी ही केलेली असताना देखील फक्त वेतनवाढ एक वर्षासाठी (एक वेतनवाढ) तात्पुरती बंद करीत असल्याचे पत्राद्वारे कळविल्याने.प्रशासन आमचीच चेष्टा करीत असल्याचा आरोप हा मोहिते कुटुंब यांच्याकडून करण्यात आला होता.
आठ दिवसापर्यंत चाललेल्या या आमरण उपोषणाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या भेटीनंतर मंगळवारी दि 30 रोजी रात्री 8:30 च्या दरम्यान मोहिते यांनी जो जबाब दिला त्या जबाबाला अनुसरून दोन महिन्याच्या आत विभागीय चौकशी पूर्ण केले जाईल असे आश्वासन दिले गेले.मोहिते यांच्या जबाबामध्ये असे म्हटले आहे की,सदर विहिरीचे काम चालू असताना शाखा अभियंता श्री.भोसले साहेब यांनी आठ वेळा विहीरीची मोजमापे घेतली होती.
परंतु ते आता नाही म्हणुन खोटे बोलत आहेत.त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी. तसेच सदर विहिरीला गटविकास अधिकारी जाधव साहेब यांनी ही मंजूरी दिली होतीत्यांनी ही विहिरीचे काम चालू करा, तुम्हाला अनुदान दिले जाईल, असे सांगितले होते. विहिरीचे काम पूर्ण केल्यानंतर संबधित अधिकारी यांनी सांगितले की, तुमची कागदपत्रे अपूर्ण असल्याने तुम्हाला पैसे देता येणार नाही. जाणून बुजुन अन्याय करणार्‍या अधिकार्‍यांवरती गुन्हा दाखल करावा व विहिरीचे थकीत अनुदानाचे पैसे दोषी शाखा अभियंता आणि गटविकास अधिकारी यांच्याकडून वसूल करून घ्यावेत.त्यामुळे त्यांच्यावर ही कायदेशीर गुन्हे दाखल करुण व्याजासह रक्कम मिळावीअसा जबाब हा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) जि.प. सातारा यांना देण्यात आलेला आहे.
दोन महिन्याच्या आत कोणतीही कारवाई न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मोहिते कुटूंबियांनी दिला आहे.यावेळी उपोषणास पाठिंबा देणारे गावांतील ग्रामस्थ ही उपस्थित होते. मोहिते यांनी हे उपोषण मागे घेतले असले तरी तरडगाव ग्रामपंचायतची स्थापना झाल्यापासून हे पहिलेच आमरण उपोषण होते.
जबाबदार ग्रामसेवक यांच्यावर कारवाई झाली पुढील काळात गट विकास अधिकारी व शाखा अभियंता यांच्यावर कारवाई होईलच परंतु लाभार्थ्यांच्या अनुदानाचा प्रश्न उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) जि.प. सातारा यांना सुटला नाही.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular