म्हसवड : म्हसवड नवीन बसस्थानक इमारत बांधकाम तसेच सातारा – लातूर व म्हसवड -माळशिरस या रस्त्यांची कामे गतीने पूर्ण केली जात नसल्याच्या निषेधार्थ सोमवार दि 17 जून रोजी आमरण उपोषण करणार असल्याचे प्रवाशी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पोपट बनसोडे यांनी सांगितले.
या संदर्भात बनसोडे यांनी सातारा जिल्हा पोलीस प्रमुख,सातारा जिल्हाधिकारी,प्रांताधिकारी माण-खाटाव, तहसीलदार माण,आगार प्रमुख ,दहिवडी आगार ,म्हसवड पोलीस ठाण्याचे सपोनि यांना निवेदन दिले आहे.
म्हसवड येथील नवीन बस्थानाकाच्या बांधकामासाठी जुने बसस्थानक पाडण्यात आले आहे,नवीन बसस्थानाकाचे काम मात्र अद्याप सुरू केले नाही,त्यामुळे प्रवाश्याना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे,नवीन बसस्थानक बांधण्याच्या कामात हलगर्जीपणा होत असल्याच्या निषेधार्थ हे उपोषण असल्याचे बनसोडे यांनी सांगितले.
सातारा-सोलापूर या महामार्गाचे काम सुरू आहे यापैकी म्हसवड ते पांढवाडी ,तसेच म्हसवड – माळशिरस या दरम्यानचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे,शिवाय या कामासाधर्भात कसलेही सूचना फलक लावण्यात आले नाहीत त्यामुळे अनेक अपघात झाले आहेत यामध्ये काहींना जीव गमवावा लागला आहे तर काहींना अपंगत्व आले आहे.
या दोनही रस्त्याचे काम धीम्या गतीने सुरू असल्याच्या निषेधार्थ व अपघातास जबाबदार असणाऱयांच्यावर कारवाई करावी यासाठी हे उपोषण असल्याचे बनसोडे यांनी सांगितले.
रस्त्यांची कामे गतीने पूर्ण केली जात नसल्याच्या निषेधार्थ सोमवार पासून आमरण उपोषण करणार : पोपट बनसोडे
RELATED ARTICLES

