पाटण:- रामापुर ( पाटण ) येथील पीर हजरत ख्वौजा कबुला हुसैनी चिष्ती यांचा ऊर्स शरीफ गुरवार दि. ८ आणि शुक्रवार दि. ९ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. या ऊर्स निमीत्त हिंदू- मुस्लिम सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन बुधवार दि. ७ फेब्रुवारी पासून सलग तीन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
या ऊर्स शरीफ कार्यक्रमात हिंदू- मुस्लिम राष्ट्रीय एकतेचे दर्शना बरोबर गुरवार दि. ८ रोजी रात्री ८.३० वा. संदल शरीफ ( गंधरात्र ) हा कार्यक्रम होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी शुक्रवार दि. ९ रोजी रात्री ९ वा. हिंदी- मराठी कव्वाल किंग अनवर जानी, मुंबई. आणि हिंदी मराठी कव्वाल क्विन झेबा बानु, मुंबई. यांचा कव्वालीचा जंगी सामना होणार आहे. हे सर्व कार्यक्रम दर्गा परिसर पाटण ( रामापुर ) येथे होणार आहे. या ऊर्स शरीफ कार्यक्रमासाठी सर्व हिंदू- मुस्लिम, समाज बांधवांनी यावे असे आवाहन हिंदू- मुस्लिम ऊर्स कमेटी पाटण – रामापुर यांनी केले आहे.