Monday, June 23, 2025
Homeताज्या घडामोडीउत्कर्ष पतसंस्थेमार्फत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

उत्कर्ष पतसंस्थेमार्फत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

वाईः उत्कर्ष नागरी सहकारी पतसंस्था मर्या., वाई आयोजित सभासद पाल्यांचा गुणगौरव सोहळा लोकमान्य टिळक ग्रंथालय येथे संपन्न झाला. संस्थेचे संस्थापक कै आनंद कोल्हापुरे यांच्या 60व्या जयंती निमित्त या सोहळ्यााचे आयोजन करण्यात आले होते. शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे याकरीता कै आनंद कोल्हापुरे यांनी हा उपक्रम सुरू केला, जो अविरत गेले अनेक वर्श अखंड सुरू आहे. या कार्यक्रमाची सुरवात प्रमुख अतिथी सौ अंजली काणे व अध्यक्ष विश्‍वास काणे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून झाली. सौ अंजली काणे यांनी आपल्या मनोगतात मुलांना व्यायामाचे महत्व सांगितले. तसेच अध्यक्ष विश्‍वास काणे यांनी पालकांना प्रबोधनपर मार्गदर्शन केले. जवळजवळ 150 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रातिनिधीक स्वरूपात संस्थेचे सभासद दादासाहेब काळे यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधुन प्रमुख अतिथींच्या हस्ते उत्कर्षच्या मिनी ए.टी.एम. मशीनचे उद्घाटन केले. संस्थेच्या ग्राहकांना व संस्थेव्यतिरिक्त इतर सर्वांना कोणत्याही राश्ष्ट्रियीकृत बँकेच्या ए.टी.एम. कार्ड द्वारे पैसे काढता यावेत याकरीता संस्थेने ही सेवा सुरू केली आहे. जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे अवाहन संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती अनुराधा कोल्हापुरे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मदनकुमार साळवेकर, परिचय श्रीमती अनुराधा कोल्हापुरे, आभार आनंदराव कांबळे व सुत्रसंचलन सौ रंगता बेडेकर यांनी केले. या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र धुमाळ, संचालक अ‍ॅड रमेश यादव, डॉ मंगला अहिवळे, श्रीकांत शिंदे, जमीरभाई शेख, अमर कोल्हापुरे, अशोक शिंदे, डॉ सुनिल कारळे मुख्य व्यवस्थापक प्रकाश पवार व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular