Sunday, June 22, 2025
Homeताज्या घडामोडीवाडीवस्ती प्रकाशमय करण्याचा उपक्रम स्तुत्य : जगताप

वाडीवस्ती प्रकाशमय करण्याचा उपक्रम स्तुत्य : जगताप

वडूज: देशाला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षांचा कार्यकाल झाला आहे. मात्र अजूनही ग्रामीण भागातील वाड्या वस्त्या विकास प्रक्रियेपासून वंचित आहेत. अश्या वाड्यावस्त्या प्रकाशमय करण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. असे प्रतिपादन पुण्याचे सहाय्यक धर्मादाय आयुक्त नवनाथ जगताप यांनी केले.
उंबर्डे (ता. खटाव) येथील माजी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत जाधव यांच्या वस्तीवर वडूज येथील सुंदरम् सामाजिक संस्थेच्या वतीने हायमास लॅम्पचे वितरण जगताप यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन समितीचे जिल्हाध्यक्ष संदिप जगताप, येरळा परिवाराचे संस्थापक धनंजय क्षीरसागर, संस्थेचे अध्यक्ष अनिल वसव, डॉ. विनय बेंद्रे, संजय गोडसे, आनंदा फडतरे, अमोल जगताप, सतिश बागल यांची प्रमुख उपस्थिती होती.
जगताप म्हणाले, समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गरजू लोक असतात. गरजूंना मदत करणार्‍या दानशूरांचीही संख्या चांगली आहे. गरजू व्यक्ती व दानशूरांचा समन्वय साधण्यासाठी चांगल्या स्वयंसेवी संस्था पुढे येणे गरजेचे आहे.
यावेळी त्यांनी धर्मादाय कार्यालयाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यात राबविलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली. तसेच सुंदरम् संस्थेने अल्पावधीत केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular