सातारा दि21( अजित जगताप) :- कोरोना महामारीने सर्व मानवी जीवन ढवळून निघाले आहे,अश्रू काढणारे सुध्दा मदतीला धावून येऊ शकत नाही, अशा वेळी वडूज ग्रामीण रुग्णालयात मृत्यू पावलेल्या देहावर अंत्यसंस्कार करण्यास वेळ लागू नये म्हणून वैधकीय अधिकारी चक्क वॉर्ड बॉय बनले. त्यांनी सहकारी कर्मचाऱ्यांच्या मदतीने पी पी किट घालून कोरोना रुग्णाचा मृत्यूदेह रुग्णवहिनीमध्ये सुरक्षित ठेवला. करोनाच्या संकटाने सध्या सर्वत्र आभाळ फाटले आहे, कुठं म्हणून ठिगळं लावायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. देवालय ओस पडली आहे तर खाजगी व सरकारी दवाखान्यात रुग्णांना उपचार करण्यासाठी बेड, ऑक्सिजन व आवश्यक बाबी उपलब्ध होऊ शकत नाही, मदतीचे हात तोकडे पडू लागले आहेत. शासकीय पातळीवर सर्वजण कोरोना युद्ध लढत आहे. पण, वैधकीय रसद कमी पडत आहे.तरी ही रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. ही सुखद अनुभव सातारा जिल्हा घेत आहे.
काल वडूज ग्रामीण रुग्णालयात ७५ वर्षाच्या वयोवृद्ध महिलेवर कोरोना रुग्ण म्हणून शर्थीचे उपचार सुरू होते.परंतु, रात्री साडेअकरा वाजता सदर महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर आज सकाळी मृत्यू देहावर अंतिम संस्कार करण्यासाठी रुग्णालयातून स्मशानभूमीत घेऊन जाण्यासाठी वॉर्ड बॉय नव्हते.वॉर्ड बॉय ची तीन पदे रिक्त आहेत,तर एकच व्यक्ती कार्यरत आहे. ही बाब लक्षात आल्याने स्वतः वैधकीय अधिकारी व कर्तव्य बजाविणाऱ्या एका कर्मचाऱ्याने पी पी किट परिधान करून मृत्यूदेह रुग्णवाहिका मध्ये ठेवण्यास मदत केली. सदर प्रसंग पाहून उपस्थित नातेवाईक व इतरांचे डोळे पाणावले होते. सध्याच्या बिकट परिस्थिती काही लोकप्रतिनिधी हे प्रसिद्धीसाठी स्थानिक कोविड सेन्टरला भेट देऊन उणिवा शोधण्यात धन्यता मानत आहेत. अशा वेळी उणीव असूनही ती दूर करण्याचा वडूज ग्रामीण रुग्णालयातील वैधकीय आधिकऱ्यांनी प्रयत्न केला आहे. त्यांचा आदर्श सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी घ्यावा असे मत हॉटेल व्यवसायिक व मराठा क्रांती मोर्चा समनव्यक श्री विनोद तथा बाबा शिंदे ,सामाजिक कार्यकर्ते विजय गोडसे व मान्यवरांनी व्यक्त केले आहे. फोटो – मृत्यूदेह रुग्णवाहिका मध्ये घेऊन जाताना वैधकीय अधिकारी,,