म्हसवड: सन 2018-19 राष्ट्रीय प्रज्ञाशोध शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली होती. एन एम एम एस या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेमध्ये क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड अंतर्गत क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी प्राथमिक शाळेची वैष्णवी हणमंत मासाळ या विद्यार्थींनीने एकूण दोनशे (200) गुणांपैकी एकशे चाळीस (145) गुण संपादन करून सातारा जिल्ह्यात 10वी व छढ-उ प्रवर्गात जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून उज्वल यश संपादन केले. वैष्णवीच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.विश्वंभर बाबर, संस्थेच्या सचिव व मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, संचालिका शरयू बाबर, प्राचार्य विठ्ठल लवटे, मुख्याध्यापक अनिल माने, राहुल फुटाणे व तिचे सर्व मार्गदर्शक शिक्षक, पालक व नातेवाईक यांनी अभिनंदन केले.
वैष्णवी मासाळ हिचे एन.एम.एम.एस. परीक्षेत यश
RELATED ARTICLES