वडूज: वडूज येथील वकील संघटनेची 2019-20 या वर्षाची निवडणूक 28 रोजी होत आहे. या निवडणूकीसाठी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी प्रत्येकी दोन अर्ज राहिल्याने सरळ दुरंगी लढत होत आहे. सचिव सहसचिव पदासह कार्यकारणी सदस्यांच्या तीन जागांची निवडणूक बिनविरोध झाली आहे.
अध्यक्ष पदासाठी अॅड. प्रल्हाद दादासाहेब सावंत (हिवरवाडी) विरुध्द अॅड. जितेंद्र शिवाजी कदम, उपाध्यक्ष पदासाठी अॅड. नितीन तानाजी शिंगाडे विरुध्द अॅड. अर्चना अमर गोडसे (चव्हाण) अशी लढत होत आहे. सचिवपदी अॅड. विशाल अंकुश जाधव पुसेगांव, सहसचिवपदी संदिप हणमंत सजगणे तर कार्यकारणी सदस्यपदी अॅड. राजू वसंत चव्हाण, अॅड. यास्मिन आलिम मोदी, अॅड. रिया जाधव यांच्या बिनविरोध निवडी झाल्या आहेत. अॅड. एल. सी. फडतरे, अॅड. एस. एस. भोसले, अॅड. एस. पी. तोडकर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहात आहेत. अॅड. सावंत हे हिवरवाडीचे विद्यमान उपसरपंच आहेत. तर अॅड. कदम यांच्या पत्नी रोहिणी कदम यांनी म्हासुर्णे गांवचे सरपंचपद भूषविले आहे. दोघांनी यापूर्वी संघटनेचे सचिवपद भूषविले आहे. त्यामुळे अध्यक्ष पदासाठी दोन्ही बाजूंनी प्रतिष्ठा पणाला लागली आहे. प्रत्येक मतदाराची थेट भेट, ग्रुप चर्चा, काही प्रमाणात भोजनावळी सुरु असल्याची चर्चा आहे.
वडूज वकील संघटना अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी दुरंगी लढत
RELATED ARTICLES