सातारा : मतदार संघांच्या पुनर्रचनेत पूर्वीच्या कराड उत्तर मतदार संघातील वारुंजी गण हा कराड दक्षिणला जोडला गेला, परंतु या विभागाचा कारखाना कार्यक्षेत्रामुळे स्नेह कायम असून, या विभागातून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना मताधिक्य द्या असे आवाहन आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले.
ते राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय काँग्रेस आणि मित्र पक्ष आघाडीचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या मौजे वारुंजी, ता.कराड व परिसरातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.
या मेळाव्यास कराड उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष देवराज पाटील, जेष्ठ कार्यकर्ते भीमराव पाटील, राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अजित पाटील-चिखलीकर, आनंदराव घोडके, कराड पंचायत समितीचे सदस्य नामदेव पाटील, माजी सदस्य पांडुरंग चव्हाण, माणिकराव पाटील, भास्कर गोरे यांची उपस्थिती होती.
यावेळी मोहम्मद आवटे, अधिकराव पवार, पांडुरंग चव्हाण, नामदेव पाटील पाटील चिखलीकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आमदार बाळासाहेब पाटील पुढे म्हणाले की 2014 च्या निवडणुकीपूर्वी भाजपने देशामध्ये आघाडी सरकारच्या विरुद्ध संशयाचे वातावरण निर्माण केले व सोशल मीडियाच्या आधारे वेगवेगळ्या घोषणा करून देशातील जनतेला भुलवले, परदेशातला काळा पैसा परत आणणार,प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये जमा करणार यासारख्या वल्गना करून खोटं बोलण्याचा कामे सरकारने केले.म्हणून या पुढील काळात म्हणजे शरद पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस राशिभविष्य राष्ट्रीय काँग्रेस आणि मित्र पक्ष आघाडीच्या सातारा लोकसभा मतदारसंघाचे त्यांचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन यावेळी आमदार बाळासाहेब पाटील यांनी उपस्थितांना केले. याप्रसंगी देवराज दादा पाटील म्हणाले की काँग्रेसचे शाश्वत विचार आणि शाश्वत विकास करणार्या स्व.यशवंतराव चव्हाणसाहेब, प्रेमलाताई चव्हाण,पी.डी. पाटीलसाहेब यांसारख्या पूर्वीच्या थोर मंडळींचे नेतृत्व मानणारा हा मतदारसंघ आहे या पूर्ण मतदार संघामध्ये आघाडीच्या उमेदवारासाठी पूरक वातावरन असल्याचे ते बोलत होते.
सरकार मार्फत केल्या जाणार्या कोणत्याही घोषणा व अफवांवर विश्वास न ठेवता त्यांच्या कोणत्याही भूलथापांना बळी न पडता राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेस आणि मित्रपक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले याना प्रचंड मताने विजयी करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी सूत्रसंचालन अण्णासाहेब पाटील यांनी, प्रस्ताविक गौरव पाटील यांनी केले व आभार संभाजी साळवे यांनी मानले. वारुंजी गटातून राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे अधिकृत उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना मताधिक्य देऊन आमदार बाळासाहेब पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली.
मेळाव्यास प्रभाकर शिंदे, अधिक पवार, जयसिंग शिंदे, जे.डी.पाटील, रमेश शिंदे, बबन भोसले, बाळासो चव्हाण, संभाजी साळवे, अल्लाउद्दीन देसाई, बापुराव सुतार, विशाल सूतार, लाजम होडेकर, अमित पाटील, फारूक पटेल, बादशहा मुजावर, अशोक पवार, अधिक पवार, अण्णासो जमाले, पांडुरंग चव्हाण, तुषार पवार, अरुण चव्हाण, जयवंत पवार, जयवंत शिंदे, पोपट पाटील, हनुमंत जमाले, शामराव माने, नाना यादव, सुभाष चव्हाण, मोहम्मद अली शेख, हाशम मुजावर, प्रकाश यादव, जे.डी. शींदे, सर्जेराव पाटील, रवींद्र बडेकर, शिवाजी जमाले, अशोक पाटील, यांचेसह वारुंजी व पंचक्रोशीतील पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
वारुंजी गणातून उदयनराजेंना मताधिक्य द्या : आ. बाळासाहेब पाटील
RELATED ARTICLES

