Monday, June 23, 2025
Homeताज्या घडामोडीआयकर कायद्याप्रमाणे वस्तू व सेवाकर कायद्यातही सुटसुटीतपणा आणावा: सी.व्ही.काळे

आयकर कायद्याप्रमाणे वस्तू व सेवाकर कायद्यातही सुटसुटीतपणा आणावा: सी.व्ही.काळे

वाई ः आयकर कायद्याप्रमाणे वस्तू व सेवाकर कायद्यातही सुटसुटीतपणा आणावा. प्रत्येक महिन्याला रिटर्न भरणे, टॅक्स भरणे व्यापार्यां साठी वेळखावू आहे. लहान व्यापार्यां साठी खूप त्रासदायक आहे. त्यामुळे सहामाही अथवा वार्षिक भरावयाला सोपे विवरणपत्र करावे. याबाबत वरिष्ठ पातळीवर उपाययोजना करावी, अशी मागणी सीए सी. व्ही. काळे यांनी केली.
शासनाच्यावतीने काढण्यात आलेली अभय योजना 2019 ची माहिती देण्यासाठी येथील लो. टिळक स्मारक संस्थेच्या सभागृहात राज्य वस्तू व सेवाकर विभागामार्फत आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते.
सीए. चंद्रकात काळे पुढे म्हणाले, छोटया व्यापार्यां साठी दर महिन्यास जीएसटी भरणे व रिटर्न फाईल करणे जिकरीचे काम आहे. त्यासाठी त्यांना आर्थिक सल्लागारांची मदत घ्यावी लागते व त्यासाठी मोबदलाही द्यावा लागतो. यामुळे व्यापार्यांतना सुलभ होईल अशी वर्षातून एकदा किंवा दोनदा रिटर्न फाईल करणारी, विवरण पत्र भरण्यात सुलभ व सोयीचे असावी तसेच त्याला वाढीव मुदत मिळावी, अशी अपेक्षा काळे यांनी व्यक्त केली.
साताराचे राज्यकर उपायुक्त शशांक जोशी म्हणाले, जुन्या कायद्याखाली देय असलेल्या कर, व्याज, दंड व विलंब शुल्क याबाबतीतल्या थकबाकीची तडजोड करण्यासाठी 6 मार्च 2019 रोजी वर्ष 2019 चा महाराष्ट्र अध्यादेश क्र. 5 काढण्यात आला आहे. या अध्यादेशाशाला महाराष्ट्र कर व्याज दंड व विलंब शुल्क यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबतचा अध्यादेश 2019 असे संबोधण्यात आले आहे. आत्तापर्यंतची ही सर्वोत्तम योजना असून मूळ थकबाकीच्या रकमेत ही दिलासा मिळत असल्याने व्यापार्यांमनी याचा लाभ घ्यावा.
साताराच्या राज्यकर सहाय्यक आयुक्त सौ. वर्षाराणी घोलप म्हणाल्या, 1 एप्रिल 2019 ते 30 जून 2019 आणि 1 जुलै 2019 ते 31 जुलै 2019 अशा दोन टप्प्यात ही योजना राबविली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात थकबाकी जमा केल्यास विवादीत रक्कमेत 30 टक्के, व्याजात 80 टक्के व दंडात 90 टक्के सवलत मिळणार आहे. दुसर्या टप्प्यात म्हणजे 1 जुलै ते 31 जुलै 2019 पर्यंत थकबाकी जमा केल्यास विवादीत रक्कमेतून 20 टक्के, व्याजात 70 टक्के व दंडात 80 टक्के सवलत मिळणार आहे. शक्यतो व्यापार्यां नी पहिल्या टप्प्यातच लाभ घ्यावा.
विक्रीकर अधिकारी सौ. शर्वरी साळुंखे यांनी अर्ज करण्याची ऑनलाईन पध्दत याविषयी माहिती दिली. विक्रीकर अधिकारी अभिजीत भोसले यांनी अध्यादेशातील व्याख्या व या योजनेचा लाभ कोणाला होऊ शकतो याची माहिती दिली. शामराव देव, रमेश ओसवाल, गांधी यांनी स्वागत केले. सीए सौ. प्रविणा ओसवाल आभार मानले. यावेळी विक्रीकर निरीक्षक पाटील, यांच्यासह वाई शहरातील व्यापारी, कर सल्लागार मोठया संख्येने उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular