महाबळेश्वर : सध्या महाराष्ट्राची चेरापुंजी महाबळेश्वर मध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून गेले आठवड्याच्या येथील धुवाधार पावसामुळे येथील प्रसिद्ध वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागला आहे.. वेण्णा तलावाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे . सांडव्यावरून वाहणार्या जलधारांचे मनोहारी दृश्य पाहावयास मिळत आहे. आज त्याचा आनंद स्थानिकां सह येथे फिरवायला आलेल्या पर्यटकांनी घेतला .
यावर्षी या चेरापुंजीत मान्सून पावसाचे उशिरा आगमन झाले . जून महिन्याचे पहिले दोन आठवडे अगदी कोरडेच गेले मात्र त्याचे दमदार आगमन 27 जून पासून सुरु झाले.ते आज तागायत तो सलग बरसत आहे .हवामान खात्याच्या नोंदीनुसार 27 जून रोजी 55.6 मिमी ,28 जून -180.9 मिमी,29 जून -195.1 मिमी,1 जुलै-110.4 मिमी ,2 जुलै -184.ओ मिमी ,व 3 जुलै -33.60 मिमी ,4 जुलै –25. 4 मिमी,5 जुलै –79. 0 मिमी व 1जुन पासून आज पर्यंत एकूण या वर्षी 1339.3मिमिम्हणजेश सुमारे 52 इंच झाल्याची नोंद आहे गतवर्षी या वेळे पर्यंत येथे 1245 . 7 मिमी तो झाला होता .दरम्यान गेले आठवडाभर येथे सुरु असलेल्या संततधारेमुळे नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या तसेच महाबळेश्वर सह पांचगणी या दोन पर्यटनस्थळास पाणी पुरवठा करणार्या येथील प्रसिद्ध वेण्णा तलावातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत होती आणि आज सकाळी वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागला आहे. त्याचे सांडव्यावरून पाणी वाहू लागल्याचे दृश्य अत्यंत मनमोहक व आकर्षक दिसत आहे.
महाबळेश्वरचा वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागला
RELATED ARTICLES