Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीविडणी येथे पाण्याच्या टाकीत पडून एकाचा मृत्यू

विडणी येथे पाण्याच्या टाकीत पडून एकाचा मृत्यू

फलटण: विडणी येथे पाण्याच्या बॅलरमध्ये पाणी काढण्यास गेले असता बाळासो बाबुराव हिरवे (वय -45) यांचा दुर्दैंवी मृत्यु झाल्याची घटना घडली.
विडणी (ता. फलटण) येथील 25 फाटानजीक राहणारे बाळासो बाबुराव हिरवे हे 4.30 वाजण्याच्या सुमारास घरासमोरील पाण्याच्या बॅलरमधील पाणी काढण्यास गेले असता तोल जाऊन बॅलरमध्ये पडून दुर्दैंवी मृत्यु झाल्याची घटना घडली.
यावेळी घरामधील व आसपासचे सर्व लोक शेतामध्ये गेले असल्याने व त्याठिकाणी कोणीही नसल्याने त्यांना वाचवता आले नाही, दरम्यान उशीराने घरच्या लोकांना ही घटना निदर्शनास आली.बाळासो हिरवे हे बर्‍याच दिवसांपासून आजारी होते, त्यामूळे ते शारिरीक दृष्टयाही खूपच कमकूवत असल्याने व अधूनमधून फीट्सही येत होती, त्यांच्या पश्चात आई वडिल,पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular