सातारा :- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. देशात व राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत आहे. कोविड१९ (करोना) मुळे अवघा देश टाळेबंदित आहे. संपूर्ण देश लॉकडाऊन असला तरी अत्यावश्यक सेवा सुरु आहेत. यामध्ये बँकिंग क्षेत्राचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार जिल्हा बँकेचे कामकाज सुरु असून बँकेच्या सर्वच शाखा मार्फत ग्राहकांना विविध प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
बँकिंग कामकाजाबाबत सर्वंकष आढावा घेणेसाठी बँकेमार्फत बँकेचे कार्याक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांची महिन्यातून किमान एकदा आढावा सभा घेतली जाते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवणेच्या कारणास्तव जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी यांना मासिक सभेसाठी बोलाविणे अडचणीचे झाले आहे. या अडचणीवर मात करणेसाठी बँकेच्या आय टी विभागामार्फत व्हिडीओ कॉन्फरन्स सुविधेची सुरुवात केली. या सेवेचे उदघाटन बँकेचे अध्यक्ष मा. आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. या कार्यक्रमास बँकेचे उपाध्यक्ष मा. श्री. सुनील माने, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, श्री. सरव्यवस्थापक श्री. राजीव गाढवे, श्री. राजेंद्र भिलारे, उपव्यवस्थापक श्री. प्रशांत देशमुख, श्री. भास्कर निकम, अधिकारी श्री. दिपक साबळे तसेच बँकेतील विविध विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी मा. आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्ह्यातील शाखा व कार्यक्षेत्रातील प्रत्येक तालुक्यातील प्रमुख अधिकारी यांचेशी बँक कामकाजविषयी संवाद साधला. बँकेचे सन २०१९-२० या सालातील ठेवी व अन्य उद्दिष्ठ पूर्ण केलेबद्दल त्यांनी संचालक मंडळाच्यावतीने सर्व कर्मचारी व अधिकारी यांचे अभिनंदन केले. यावेळी ते म्हणाले, कोविड-१९ या विषाणूजन्य जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व उद्योग, व्यवसाय, शेती, वाहतूक यावर विपरीत परिणाम झालेला असून ग्राहकांची उत्पन्नाची साधने बंद झालेली आहेत. सध्यस्थितीत बँकिंग व्यवहार अत्यावश्यक सेवेत असला तरी बँकेमधून पैसे काढणे, पैसे भरणे या बाबीस प्राथमिकता दिलेली आहे. ग्राहकांना बँकेच्या ऑनलाईन सुविधेचा वापर करणेसाठी आवाहन करावे तसेच ग्राहकांना जलद व परिपूर्ण बँकिंग सुविधा देणेसाठी सदैव कार्यरत रहावे. यानंतर त्यांनी बँकेच्या सर्वंकष कामकाजाचा लेखाजोखा सांगून चालू आर्थिक वर्षात कामकाजाचे योग्य ते नियोजन करून विना तक्रार कामकाज करणेबाबत आवाहन केले.
उपाध्यक्ष मा. श्री. सुनील माने म्हणाले, आज देशावर राष्ट्रीय आपत्ती आली आहे. बँकिंग क्षेत्रात्तील आव्हाने वाढत असून सर्व कर्मचाऱ्यांनी योजनाबद्ध कामकाज करून स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. बँकेचे जेष्ठ संचालक व विधानपरिषदेचे सभापती मा. ना. श्रीमंत रामराजे निंबाळकर व अध्यक्ष मा. आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मार्गदर्शनाखाली गेल्या पाच वर्षात बँकेने चांगली प्रगती केलेली आहे. बँकेचे आदर्शवत कामकाज असून ते कायम राखणेसाठी प्रयत्नशील राहाणेसाठी आवाहन केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी तालुक्यातील व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे सर्व अधिकाऱ्यांशी संवाद साधून कामकाजाचा सर्वंकष आढावा घेतला. ते म्हणाले, बँकेने आधुनिक तंत्राचा वापर करून बँकेने व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारा जिल्ह्यातील अधिकारयांशी संपर्क साधला जात असून यामुळे आढावा सभेसाठी येणे जाणेचा वेळ व पैसा वाचला जाणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेने केली व्हिडीओ कॉन्फरन्स सुविधेची सुरुवात !
RELATED ARTICLES