Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीआद्यशंकराचार्य विधुशेखर भारती यांचा शिवशंभूस महाअभिषेक

आद्यशंकराचार्य विधुशेखर भारती यांचा शिवशंभूस महाअभिषेक

महाबळेश्वरःपरमपूज्य गुरुस्वामीजींच्या आदेशानुसार जगद्गुरू शृंगेरी पीठाचे 37 वे मठाधिपती आदयशंकराचार्य श्री श्री विधुशेखरा भारती यांची सध्या भारत भ्रमण विजय यात्रा सुरु असून या अंतर्गत त्यांचा महाराष्ट्र प्रांताचा भ्रमण दौरा सुरु आहे .या अंतर्गतच ते गुरुवार व शुक्रवारी महाबळेश्वर येथे होते.येथील मुक्कामात त्यांनी श्री क्षेत्र महाबळेश्वर येथिल महाबळेश्वराच्या शिव मंदिरात जाऊन शिवशंभूस महाभिषेक तसेच वेदमंत्रांच्या जयघोषात पूजन आरती केली.तसेच पंचगंगा मंदिरात जाऊन पंच गंगेचे पूजन वेद मंत्रोचारात केले तसेच पंचगंगेत स्नानाचा लाभ घेतला .प्रसिद्ध येथील आराम लॉजिंग आणि बोर्डिंग (नंदादीप बंगला ) येथे ते मुक्कामास होते .
गणेश जयंतीचे औचित्य साधून त्याच्या हस्ते रानडे यांच्या गणेशाला वेद मंत्रोचारात अभिषेक व महाआरती करण्यात आली .यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते .महाबळेश्वर मुक्कामात जगद्गुरू च्या हस्ते चंद्रमौलीश्वर पूजन सोहळा संपन्न झाला तसेच भाविकांना दर्शनाचा हि लाभ झाला . तसेच आध्य शंकराचार्य जगद्गुरू श्री श्री विधुशेखरा भारती यांचे दर्शन व आशीर्वादपर अनुग्रह मार्गदर्शन हि संपन्न झाले .याच लाभ हि भावींकानी मोठ्या संख्येने घेतला

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular