Saturday, June 21, 2025
Homeताज्या घडामोडीखाजगी विहिरीवरील विद्युत मोटारी बंद करण्याच्या सुचनाःजिल्हाधिकारी

खाजगी विहिरीवरील विद्युत मोटारी बंद करण्याच्या सुचनाःजिल्हाधिकारी

म्हसवड ः ढाकणी तलाव्यात उरमोडीचे पाणी सोडल्याने तलाव काही अंशी भरला असून या पुढील काळात दुष्काळ निवारणासाठी प्रशासन सज्ज असून,जनतेची पाण्याची तहान भागवण्यासाठी तलाव्यात असलेल्या खाजगी विहिरी वरील विद्युत मोटारी बंद करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिल्या
दुष्काळी माण तालुक्यात दुष्काळाची दाहकता वाढली असून पिण्याच्या पाण्याची अवस्था दयनीय झाली आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सिंघल यांनी ढाकणी तलाव्यातून ज्या विहिरीतून टॅकरने पाणी पुरवठा केला जात आहे त्या फिडिंग पॉईंटला भेट दिली या वेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, गटविकास अधिकारी जगन्नाथ शेलार ग्रामसेवक संतोषकुमार माळवे आदि मान्यवर उपस्थित होते.
ढाकणी तलाव्यातील विहिरी वरून तालुक्यातील सुमारे 33गावांना 70टॅकर द्वारे दररोज 1कोटी 40लाख लिटर पाणी शासन जनता व शेतकरीच्या पशुधनाला देत आहे. भविष्यात दुष्काळी परिस्थिती वर मात करण्यासाठी शासनाने ढाकणी तलाव्यात उरमोडीचे पाणी सोडल्याने तलाव काही अंशी भरला असून या पुढील काळात दुष्काळ निवारणासाठी प्रशासन सज्ज असून पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये यांची दक्षता घेण्याच्या सुचना सबंधीताना देऊन सौ.सिंघल यांनी तलाव व परिसरातील विहिरी वरील विद्युत मोटारी बंद करण्याच्या सुचना दिल्या आहेत. वडजल गावचे ग्रामसेवक संतोषकुमार माळवे म्हणाले ढाकणी तलाव्यात उरमोडीचे पाणी सोडल्याने या फिडिंग पॉईंट वरून संबंधित गावांना पाण्या देण्यासाठी कसलीही अडचण येऊ देणार नसल्याचे सांगितले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular