पाटण :- पाटण तालुक्यात गेले अडीच महिने सतत मुसळधार पडत असलेल्या पाऊसाने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून. वर्षभर पुरेल इतकही पिक शेतकऱ्यांच्या हाताला लागेल याची शाश्वती राहिली नाही. तर गुरांच्या वैरणीचाही प्रश्र्न गंभीर झाला असून शेतकऱ्यांचे जगणं मुश्किल झाले आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पाटण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी पाटण तहसील कार्यालयासमोर सोमवारी सकाळी ११ वा. शेकोटी आंदोलन करण्यात येणार असून शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पाटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रमबाबा पाटणकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
या पत्रकात पुढे म्हटले आहे. पाटण तालुक्यात सलग अडीच महिने पडत असलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले असून. शेतात पेरणी केलेल्या बियाणासह उगवून आलेली पिके देखील कुजली आहेत. तर काही ठिकाणी वाहून गेली आहेत. शेतकऱ्यांना वर्षभर जगण्यासाठी पुरेल इतके ही पिक शेतकऱ्यांच्या हाताला लागेल अशी परिस्थिती यंदाच्या पाऊसाने ठेवली नाही. गुरांना वर्षभर मिळणारी वैरण देखील नष्ट झाली आहे. या सतच्या पाऊसाने तालुक्यातील शेतकऱ्यांचे जगणं मुश्किल करून सोडले आहे. अजून हि पाऊस थांबण्याचे चिन्हे दिसत नाही. म्हणून पाटण तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी पाटण तहसील कार्यालयासमोर सोमवारी दि. २० रोजी सकाळी ११ वा. शेकोटी आंदोलन करण्यात येणार असून शेतक-यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन पाटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रमबाबा पाटणकर यांनी केले आहे.