पाटण दि.२३- पाटण विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते व राज्याचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रम म्हणजे तमाम जनतेला त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मिळालेली संधी आहे. यावेळी दादांना शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री खा. शरद पवार यांचेसह देश, राज्य व जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम ऐतिहासिक व्हावा यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते प्रयत्नशिल असून यावेळी सर्वांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन विक्रमसिंह पाटणकर अमृतमहोत्सव गौरव सोहळा समितीचे अध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी केले.
पाटण येथील बी. एड. काॅलेजच्या प्रांगणात हा अमृतमहोत्सव गौरव सोहळा आयोजित करण्यात आला असून या परिसराची पाहणी नुकतीच युवा नेते सत्यजीतसिंह पाटणकर यांनी केली त्यावेळी राजाभाऊ शेलार बोलत होते.
यावेळी खरेदी विक्री संघाचे चेअरमन अॅड. अविनाश जानुगडे, सुभाषराव पवार, संजीव चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तमराव भापकर, विलासराव क्षीरसागर, शंकर शेडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सत्यजीतसिंह पाटणकर यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह बाळासाहेब देसाई काॅलेज, बी. एड. काॅलेज , मंडप, स्टेज, भोजन व्यवस्था आदीची पहाणी करून आवश्यक सुचना दिल्या. याशिवाय स. पो. नि. उत्तमराव भापकर यांचेसह सुरक्षा व्यवस्था याबाबतही पहाणी केली.
विक्रमसिंह पाटणकर अमृतमहोत्सव सोहळा कार्यक्रम स्थळाची सत्यजीतसिंह पाटणकर यांचेकडून पहाणी.
RELATED ARTICLES