
सातारा :- हॉटेल व्यवसायासाठी ॲड. विनायकराव आगाशे यांनी दिलेल्या योगदाना प्रित्यर्थ एका सत्कार समारंभाचे आयोजन हॉटेल मालक संघातर्फे करण्यात आले होते. या सत्कार समारंभात बोलताना थोर विचारवंत प्राचार्य यशवंत पाटणे म्हणाले कि, ॲड.विनायकराव आगाशे हे स्वतःला शिक्षक समजतात आणि जी एस टी चे अभ्यासक मानतात. याच भूमिकेतून त्यांनी VAT कायद्याची आणि सध्या अस्तित्वात असलेल्या GST कायद्याची ओळख करदात्यांना करून दिलेली आहे. एका अर्थाने त्यांच्या मते हि शैक्षणिक सेवाच आहे. त्यामुळेच मनापासून ते या क्षेत्रात रमलेले आहेत.
याच भूमिकेतून सातारा जिल्ह्यातील होतकरू तरुणांना कर विषयक कायद्याची ओळख करून देवून कर सल्लागार म्हणून त्यांना नावारूपाला आणले. असाच उदान हेतू डोळ्यासमोर ठेवून ते कर क्षेत्रात कार्यरत आहेत. अश्या शब्दात पाटणे सरांनी आगाशे यांचा गौरव केला.
हाच धागा पकडून हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष राजू भोसले म्हणाले कि, याच सर्व गोष्टींचा विचार करून मानपत्र देण्याचा निर्णय घ्येण्यात आला. या मानपत्रामुळे त्यांचा हुरूप आणखीन वाढेल. त्यासाठी आवश्यक असलेले बळ त्यांना मिळो अश्या शब्दात ॲड. विनायकराव आगाशे यांचा गौरव केला.
संघाचे उपाध्यक्ष मोहन पुरोहित म्हणाले की, आजच्या तरुणाईला अशा शिक्षकांची गरज आहे. या कार्यक्रमाला कवी प्रदीप कांबळे हे देखील उपस्थित होते. त्यांनी मानपत्राचे वाचन केले आणि हे मानपत्र प्राचार्य यशवंत पाटणे यांच्या हस्ते आगाशे यांना देण्यात आले.
सत्काराला उत्तर देताना ॲड. विनायकराव आगाशे म्हणाले की, मि GST क्षेत्रातील एक वारकरी आहे. वारकरी मंडळी सारखेच मी या क्षेत्रात दंग असतो . त्यामुळेच आत्मीयतेने गरजू करदात्यांना त्यांच्या अडचणीतून ते मार्ग काढून देत असतो . येणाच्या काळात देखील याच भूमिकेतून ते याच क्षेत्रात कार्यरत राहणार आहे.
संयोजकांनी दिलेल्या मानपत्राबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन नेटकेपणाने सुनील मोरे यांनी केले.
कार्यक्रमास हॉटेल व्यावसाईक राजन शहा, जगदीश शिर्के ,संजय निकम ,बळीराम इंगळे, प्रवीण जोशी ,सुभाष भोसले, निसर्गप्रेमी यशवंत घोरपडे तसेच सौ. विद्या आगाशे आणि वैशाली आगाशे आदि मान्यवर मंडळी उपस्थित होते.