पुसेगाव :- विनापरवाना खटाव तालुक्यातील बुध येथे तळेगाव दाभाडे (पुणे) येथून आल्याने इक्बाल कादर शेख व त्याच्या पत्नीवर पुसेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची बातमी प्रसिद्ध केल्याचा राग मनात धरून दैनिक प्रभातचे पुसेगाव प्रतिनिधी प्रकाश राजेघाटगे यांना मारहाण करण्यात आली आहे. एक तर कायदा धाब्यावर ती बसवून. लॉक डाऊन मध्ये प्रवास बंदी असताना सुद्धा प्रवास केला. आणि पुसेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्ह्याची बातमी करण्याच्या पत्रकाराला मारहाण केली. त्यामुळे पुसेगाव आणि परिसरातील नागरिकांनी हल्ल्यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पुसेगाव पोलीस स्टेशनने हा भ्याड हल्ला करणाऱ्यांना योग्य ती कारवाई करावी. जास्तीजास्त शिक्षा व्हावी. जेणेकरून अशा घटना पुन्हा होणार नाही. प्रकाश घाडगे यांच्या पाठीमागे सर्व पत्रकार खंबीरपणे उभे आहेत. तरी पुसेगाव पोलीस स्टेशन नी लवकरात लवकर संबंधित हल्लेखोरांना कठोर शासन करावे. असे आवाहन पत्रकार विशाल सूर्यवंशी यांनी केले. पुसेगाव पोलीस स्टेशनमध्ये यासंदर्भात गुन्हा नोंद झाला आहे.
पत्रकाराला बातमी प्रसिद्ध केली म्हणून दमदाटी व मारहाण ; संबंधित हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी
RELATED ARTICLES

