पाटण:- विश्वहिंदू परिषद शाखा- पुसेसावळी यांच्या वतीने श्रीभगवान महावीर धारेश्वर जिवदया केंद्र धारेश्वर दिवशी या गोशाळेला हिंदुस्थान पारसमणी पशु आहार ची ३२ पोती व रोख रक्कम १५ हजार रुपये दान देण्यात आले. आज अखेर ७० हजार रुपये मदत मिळवून देण्यात आली आहे. भविष्यात पुढे गोशाळेला काही अडचण निर्माण झाल्यास विश्वहिंदू परिषदेकडून मदतीचा हात पुढे करु. असे आश्वासन वि.ह.प.चे सातारा जिल्हा अध्यक्ष अरविंदराव कांबळे यांनी तिर्थक्षेत्र धारेश्वर येथे दिले.
यावेळी धारेश्वर मठाधिपती निळकंठ स्वामी यांनी बोलताना सांगितले सद्याच्या परस्थितीत या गोशाळेला चाऱ्याची चणचण भासत असताना आडचणीच्या काळात हिंदुस्थान पारसमणी पशू आहार हे खाद्य आलेली मदत हि लाखमोलाची आहे. विश्वहिंदू परिषद नेहमीच या गोशाळेला मदतीचा हात देते. हि मदत मिळवून देण्यासाठी बजरंग दलाचे सातारा जिल्हा संयोजक यांचे विशेष मोलाचे सहकार्य लाभले आहे. या मदतीसाठी वि.ह.प. चे सातारा जिल्हा अध्यक्ष- अरविंदराव कांबळे, उपाध्यक्ष- यशवंतराव जगताप, सतिश सोलापूरे, सुदर्शन मिठारे, अमित गाडवे, संदिप लोखंडे, सुनिल निगडीकर यांचे सहकार्य लाभले.
विश्वहिंदू परिषदेकडून धारेश्वर येथील गोशाळेला पशू आहाराची मदत.
RELATED ARTICLES