Tuesday, June 24, 2025
Homeताज्या घडामोडीवाई विठ्ठलराव जगताप विद्यार्थ्यानी शिष्यवृत्ती गुणवत्तेचा डंका राज्यभर पोहचिला

वाई विठ्ठलराव जगताप विद्यार्थ्यानी शिष्यवृत्ती गुणवत्तेचा डंका राज्यभर पोहचिला

वाई : पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2018-19 येथील विठ्ठलराव जगताप नगरपालिका शाळा क्रमांक पाच मधील पाच विद्यार्थ्यांनी राज्याच्या गुणवत्ता यादीत तर 17 विद्यार्थ्यांनी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त करून अभूतपूर्व यश प्राप्त केले. आणि वाईच्या गुणवत्तेचा डंका राज्यभर पोहचविला. दोन विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे.
गंगापूरी येथील पालिकेच्या या शाळेत बालवाडी, अंगणवाडी तसेच इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत प्रत्येकी पाच अशा 25 तुकडया आहेत. शहराबरोबरच ग्रामीण भागातील एक हजारहून अधिक विद्यार्थ्यांची पटसंख्या असून ग्रामीण भागातील सुमारे 750 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यासाठी पालकांनी पुढाकार घेऊन खाजगी बसची सोय केली आहे. शाळेचे वर्ग तीन ठिकाणच्या इमारतीत 26 खोल्यातून भरतात. वरिष्ठ मुख्याध्यापकासह एकूण 27 शिक्षक येथे कार्यरत आहेत. शाळा इमारती पाठयक्रमातील चित्रासह विविध कलांनी सुभोभित आहेत. शाळेत शुध्द पिण्याच्या पाण्याबरोबरच ई-लर्निंग व एलसीडी प्रोजेक्टरची सोय आहे. शाळेचा स्वतंत्र वाद्य व गीत वृंद असून दररोज संगीतमय परिपाठ घेतला जातो. विद्यार्थ्यांच्या कला व क्रीडा गुणांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी स्वतंत्र स्नेहसमेलन व क्रीडा स्पर्धा भरविल्या जातात. शाळेत विविध भौतिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी लोकसहभागातून सुमारे 18 लाखांची कामे करण्यात आली आहेत. येथील शिक्षणासाठी आनंददायी वातावरण व प्रामाणिकपणे काम करणारा शिक्षकवर्ग यामुळे दिवसेंदिवस शाळेची पटसंख्या वाढत आहे. वर्ग खोल्याची कमतरता असताना त्यावर मात करीत येथील शिक्षकवृंद विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. त्यामुळे शाळा गुणवत्ता विकास कार्यक्रमात विभागात प्रथम आली आहे. 2015 मध्ये शाळेला आयएसओ मांनाकन प्राप्त झाले आहे.
शाळा व्यवस्थापन समिती, पालिका शिक्षण प्रशासनाधिकारी, मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2006- 7 मध्ये शाळेत ,शिष्यवृत्ती टॅलेन्ट बँच, हा उपक्रम सुरु करण्यात आला. त्याअंतर्गत सकाळी 8 ते 10 या वेळेत शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांचा जादा तास घेण्याचे नियोजन करण्यात आले. वर्गशिक्षकांसह सर्व विषय निहाय मार्गदर्शक शिक्षक कोणतीही सुट्टी न घेता विद्यार्थ्यांची तयारी करून घेतात. वर्षभरात शंभर सराव परीक्षा घेतात. पहिल्याच वर्षी शाळेच्या चार विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. मागील दहा वर्षात राज्यात 8 तर एकूण 118 विद्यार्थी जिल्हा व राज्यस्तरावरील शिष्यवृत्तीच्या गुणवत्ता यादीत चमकले आहेत. यावर्षी फेब्रुवारी 2019 मध्ये झालेल्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पाच विद्यार्थ्यांनी राज्यस्तर तर 17 विद्यार्थ्यांनी जिल्हास्तर गुणवत्ता यादीत यशाचे उंच शिखर गाढून उच्चांक केला. या विद्यार्थ्यांना वरिष्ठ मुख्याध्यापिका कांताताई खडसरे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्गशिक्षक साधना जाधव, जयंत धायगुडे, वृषाली कासवेद, विषय शिक्षक विकास घोणे, संतोष धुरगुडे, मनीषा देशपांडे व नवनाथ शिंदे या शिक्षकांनी विशेष मार्गदर्शन केले. शाळेतील विद्यार्थी विकास बाळू मांडे व शीतल राजेश बुलुंगे या दोन विद्यार्थ्यांनी एमबीबीएस या वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळविला तर संचित सचिन जाधव व सौरभ निशिकांत लहाने या दोन विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयात निवड झाली. शाळा समितीच्या अध्यक्षा निर्मला चोरगे, नगरसेवक चरण गायकवाड, प्रदीप चोरगे, शीतल शिंदे यांच्यासह समितीच्या सर्व सदस्यांनी तसेच नगराध्यक्ष डॉ. प्रतिभा शिंदे, उपाध्यक्ष अनिल सावंत, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ व प्रशासनाधिकारी साईनाथ वाळेकर आदींनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular