सातारा : व्यापारी सहकारी पतसंस्था ही सातार्यातील अग्रगण्य पतसंस्था गुढीपाडवा 17 मार्च 1991 रोजी सातार्यातील लघुउद्योजक, व्यापारी, सुशिक्षित बेरोजगार यांनी गुरुप्रसाद सारडा यांचे नेतृत्वाखाली एकत्र येऊन केवळ रु. 72000 भागभांडवलावर सुरु केली. गत 28 वर्षांमध्ये जिल्हयातील एक नामवंत व पारदर्शक कारभार करणारी दर्जेदार अर्थसंस्था म्हणून नावारुपास आलेली आहे. आज संस्था राजपथावरील स्वमालकीच्या पाच हजार चौ. फूट इमारतीमध्ये संपूर्णपणे संगणकीकृत कार्यालयामध्ये कार्यरत असून 5000 हून अधिक सभासद, 1 कोटी 10 लाख भागभांडवल, 23 कोटी ठेवी आणि 14 कोटीहून अधिक कर्जवाटप व सभासदांना सातत्याने लाभांश वाटप हे संस्थेचे वैशिष्ट्यं असून समाजातील सर्व थरांना योग्य अर्थ पुरवठा व्हावा म्हणून पतसंस्थांच्या आर्थिक विश्वामध्ये सर्वात रास्त व्याजदरात सामान्य कर्ज, तारणी कर्ज व वाहन कर्ज वितरित केली जातात. तसेच सोने तारण, कॅश के्रडिट, वेअर हाऊस रिसीट कर्जे दिली जातात. संस्था कर्जवसुलीसाठी सातत्याने व नियमितपणे कार्यरत असते. त्यामुळे एनपीए कर्जापोटी 100% एनपीए तरतूद करुन सुद्धा यंदा रु. 60 लाखाहून अधिक नफा मिळविला असून लाभांश प्रस्तावित 15% देण्याचे योजिले आहे.संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री. गुरुप्रसाद सारडा, चेअरमन श्री. दिलीप पिलके,व्हा. चेअरमन श्री. शिवप्रसाद मिणियार, संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्ग संस्थेचा कारभार अधिकाधिक लोकाभिमुख आणि पारदर्शक व काटकसरीने करुन संस्था सतत नफ्यात चालवून नावारुपास आणली आहे. केवळ ठेवी करुन कर्जवाटप करणे आणि नफा मिळविणे हाच उद्देश न बाळगता सामाजिक बांधिलकीची विविध कामेसंस्थेने सातत्याने केली आहेत. सर्व सभासद व हितचितकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
व्यापारी सहकारी पतसंस्थेस 60 लाखाचा निव्वळ नफा
RELATED ARTICLES