सातारा दि 23 (जिमाका ) पाटण तालुक्यातील वाघजाईवाडी येथे गणपत खाशाबा पवार यांच्या
गोठ्याची भिंत पावसामुळे खचून झालेल्या दुर्घटनेत एक म्हैस आणि रेडकू यांचा मृत्यू झाला. दुर्घटना घडलेल्या ठिकाणी प्रशासनाने त्वरित मदत पाठवून देत पडलेल्या भिंतीचा मलबा जेसीबीने हटवला. तसेच जनावरांचे मृतदेह बाहेर काढून, पोस्टमार्टम करून त्यांची विल्हेवाट लावली. सदर घटनेचा पंचनामा झाला असून नुकसानग्रस्तांना मदत देण्याची कारवाई त्वरित करण्यात येत असल्याचे प्रांताधिकारी सुनील गाडे व तहसीलदार पाटण अनंत गुरव यांनी सांगितले .
वाघजाईवाडीत भिंत खचून दोन जनावरे मृत्युमुखी ; प्रशासनाचा तात्काळ मदतीचा हात
RELATED ARTICLES