Tuesday, June 24, 2025
Homeताज्या घडामोडीमहाराष्ट्राचे वैभव असलेल्या वाईचे प्रश्‍न मार्गी लावणार

महाराष्ट्राचे वैभव असलेल्या वाईचे प्रश्‍न मार्गी लावणार

वाईः वाई हे महाराष्ट्राचे वैभव असून वाई शहराच्या विकासाबाबत जे जे प्रश्‍नअसतील त्या सर्व प्रश्‍नांचा नक्कीच निपटारा केला जाईल, अशी ग्वाही देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाईच्या भुयारी गटर व जलनि:सारण तथा एस. टी. पी.प्रक्रिया प्रकल्प याच्या एस. टी. पी.प्लॅनला जागेवरच मंजुरी देत सर्व विषयांना मंजुरी दिल्याने वाई शहरातील नागरीकांनी विशेष आनंद व्यक्त केलाआहे. माजी आमदार तथा किसनवीर उद्योग समूहाचेअध्यक्ष मदन भोसले यांच्या नेतृत्वाखाली वाई नगरपालिकेच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या या आश्‍वासक ग्वाहीमुळे वाईच्या नव्या विकासाचा अध्याय सुरु झालाआहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी मदन भोसले यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी वाईच्या नगराध्यक्षा डॉ.प्रतिभा शिंदे यांच्यासह नगरसेवक व विविध मान्यवर उपस्थितहोेते. वर्षा निवासस्थानात झालेल्या चर्चेत बोलताना मदन भोसले यांनी वाईचे विविध प्रश्‍न मांडले. त्यामध्ये सुमारे 42 कोटी रुपयांची मलनि:स्सारण योजना मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली. तसेच या विषयाचा एस.टी. पी.प्लॅन केला आहे का याचीही विचारणा करुन या प्रकल्पाला निधीची कमतरता भासू देणार नाही याचीही ग्वाही दिली. यावेळी सिद्धेश्‍वर मंदिरालगतचा रस्ता ते घोटवडेकर हॉस्पिटल लगतचा रस्ता जोडणारा नवापूल व अ‍ॅप्रोचरस्ते, वाई शहराच्या पूर्व बाजूच्या प्रवेशद्वारावरअसलेल्या फुलेनगर येथे नविन पूल उभारणे,सोनगिरवाडी येथे नविन भाजी मंडई व शॉपिंगसेेंटर उभारणे, नगरपरिषद शाळा क्र. 4 साठी नविन सर्व सुविधांनी सुसज्य इमारत उभारणे यासह विविध प्रश्‍न मुख्यमंत्र्यांसमोर लेखी निवेदनासह मांडण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व विषयांना जागेवरच मंजुरी देत वाईच्या विकासाला चालना देण्याबाबत कोठेही कमी पडणार नसल्याची ग्वाही दिली. विशेषत: मलनि:स्सारण प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांनी दाखवलेली तत्परता मदन भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या शिष्टमंडळाला विशेष भारावून गेली.
यावेळी मदन भोसले यांनीवाईचे कंदीपेढे, शॉल, बुके, आंबे देवून मुख्यमंत्र्यांचा सत्कार करुन सुमारे पाउणतास एवढा वेळ दिल्याबद्दल आभार मानले. त्यावर मुख्यमंत्र्यांनी दादा, तुम्ही आणलेले सर्व प्रश्‍न मार्गी लावले जातील असे सांगून तुमचे सर्व काम योग्य व नियमानुसार असते असे सांगितले. यावेळी वाई शहर भाजपा अध्यक्ष अजित वनारसे, शेखरशिंदं नगराध्यक्षा डॉ. प्रतिभाशिंदे, डॉ. सुरभी भोसले, अनिलजाधव, नगरसेवक सतिश वैराट, महेंद्र धनवे, सुमैय्या इनामदार, रुपाली वनारसे, वासंती ढेकाणे यांच्यासह विजय ढेकाणे, अमजद इमानदार आदी उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular