वाई : गुरुवार दिनांक 20 जून रोजी रात्री आकराच्या सुमारास औद्योगिक वसाहतवाई येथील कचरा डेपो जवळ दोनबैल जातीची वासर अनिल लोणकर व विनायक जाधव यांना आढळली त्यांनी त्वरित शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा धारकर्यांना व शंकरी कट्ट्याच्या सदस्यांना याबाबतची माहिती दिली.धारकर्यांनी लगेच त्या जागी जाऊन ती वासर ताब्यात घेतली व शिवप्रतिष्ठानचे धारकरी विशाल मोरे यांच्या गोठ्यात ठेवण्याची सोय केली.
शेतकर्याने आपल्या घरी पाळलेल्या गायीला खोंड झाल्याने त्याला जास्त दुध द्यावे लागत असल्याचे कारण पुढे करीत त्या वासराला घाटात या बेवारस जागेतअसणार्याझुडपात आणून सोडले जाते. वाई एमआयडीसीतील कचरा डेपोजवळ यावेळी वासरांना सोडण्यात आले होते. त्वरित प्राणी मित्राच्या लक्षात ही बाब आली असूनत्यांनी भटक्या कुत्र्यांपासून त्याचे रक्षण केले. चार ते पाच कुत्रांचा कळप त्या वासरावर झडप घालण्यासाठी डूक धरून बसला होता. वाई शहरातील हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकार्यांनीयाचे गांभीर्यलक्षात घेवून, प्राणी मित्र-स्वप्नील भिलारे, काशिनाथ शेलार यांनी त्वरित वेळेच्या करुणा मंदीर गोशाळेत त्याची व्यवस्था करून नितीन जगताप यांच्या चार चाकी वाहनाच्या सहाय्याने त्याला सुखरूप पोहोचविण्यात आले. करुणा मंदिराचे विश्वस्त दीपक ओसवाल यांनी या वासराना करुणा मंदीर गोशाळेत ठेवून मोलाचे सहकार्य केले. फिरायला येणार्या वाईकर नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्याने पुढचा अनर्थ टाळला. ज्या दुभत्या जनावरांच्या जीवावर बळीराजा आपला घर-संसार चालवीत असतो त्या जनावराच्या वासराला भटक्या कुत्र्यांच्या हवाली बिन्दास्त कराण्यासाठी सोडण्यात येते. ही किती चीड येण्यासारखी बाब आहे. शेतकर्यांचे माणुसकी लोप पावली आहे कि काय अशा प्रकारचे चित्र सध्या वाई तालुक्यात दिसत आहे. शेतकर्यांना या बाबत प्रबोधन करण्याची खर्या अर्थाने गरज असल्याचे आज काळची गरज होवून बसली आहे. दुभत्या जनावराचे शेण, गोमुत्र, व मुख्य दुध हे योग्य नियोजन करून केल्यास फायदा नक्कीच होतो. त्यासाठी कोवळ्या जनावराच्या जीवावर उठण्याची गरज नाही. तसेच अशा पद्धतीने निर्दयीपणे बेवारस सोडणार्या शेतकर्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी फिरायला येणार्या संघटना करीत आहेत. तसेच थोड्याच दिवसात तशा आशयाचे निवेदन वाई पोलीस ठाण्यात देण्यात येणार असल्याचे या संघटनांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
औद्योगिक वसाहतीत बेवारस वासराला प्राणीमित्रांमुळे मिळाले जीवदान
RELATED ARTICLES