Saturday, June 21, 2025
Homeताज्या घडामोडीवॉटरकप स्पर्धा ही सुवर्णसंधी :डॉ.नितिन वाघमोडे

वॉटरकप स्पर्धा ही सुवर्णसंधी :डॉ.नितिन वाघमोडे

म्हसवडः दुष्काळी माण तालुक्याला सुकाळी करण्यासाठी वॉटरकप ही स्पर्धा सुवर्णसंधी असल्याचे प्रतिपादन मुंबई अतिरिक्त आयकर आयुक्त डॉ. नितिन वाघमोडे यांनी म्हसवड केले.
माण तालुक्यातील वॉटरकप स्पर्धेत सहभागी असणार्‍या निवडक गावकर्‍यांची आढावा बैठक क्रांतिवीर शैक्षणिक संकुल म्हसवड येथे आयोजित केली होती . बैठकीच्या अध्यक्ष स्थानी अतिरिक्त आयकर आयुक्त डॉ. नितिन वाघमोडे होते तर प्रमुख मान्यवर म्हणून क्रांतिवीर शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष प्रा. विश्वंभर बाबर तसेच वॉटरकप स्पर्धेचे समन्वय अजित पवार, प्रदीप पोळ व सहकारी उपस्थित होते . यावेळी बोलताना डॉ. वाघमोडे म्हणाले दुष्काळी माण तालुक्याचा कलंक पुसून टाकण्याची ही संधी वॉटरकप स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे . केवळ बक्षीसासाठी नव्हे तर गावाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सर्वांचा सहभाग महत्वाचा असल्याचे त्यांनी स्प्ष्ट केले .
पुढे बोलताना डॉ. वाघमोडे म्हणाले या स्पर्धेच्या माध्यमातून गावा बरोबरच राष्ट्राचा विकास होणार आहे . श्रमदाना बरोबरच लोकवर्गणी सुद्धा महत्वाची आहे . केल्याने होत आहे हे गत दोन वर्षात माण तालुक्याने राज्यस्तरावर दाखवून दिलेले आहे . याही वर्षी राज्य स्तरावर माण तालुका अग्रेसर राहणार आहे . मरगळ झटकून सकारात्मक विचाराने पुढे या यश तुमचेच राहणार आहे. तुम्ही सकारात्मक विचार व सहभाग दाखिवला तर आर्थिक सहकार्यासाठी अनेकजण पुढे येतील . तुम्ही प्रामाणिकपणे वाटचाल करा. यानिमित्ताने डॉ. वाघमोडे यांनी गावनिहाय आढावा घेतला व मार्गदर्शन केले. यावेळी क्रांतीवीर शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष प्रा. विश्वंभर बाबर यांनी मनोगत व्यक्त केले व डॉ. नितीन वाघमोडे व उपस्थित सर्वांचा सत्कार केला .
तालुका समन्वयक अजित पवार व प्रदीप पोळ यांनी मार्गदर्शन केले . यावेळी गतवर्षीच्या विजेत्या गावाचे प्रमुख तसेच सरपंच व सध्याच्या सहभागी गावाचे प्रमुख मान्यवर उपस्थित होते .

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular