Thursday, June 19, 2025
Homeठळक घडामोडीपाटणला विकेंड लॉकडाऊन १०० टक्के यशस्वी..; शासकीय यंत्रणेने मानले सर्वांचे आभार..

पाटणला विकेंड लॉकडाऊन १०० टक्के यशस्वी..; शासकीय यंत्रणेने मानले सर्वांचे आभार..

पाटण:- वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने घोषित केलेल्या विकेंड लॉकडाऊनला पाटण शहर व परिसरात १०० टक्के प्रतिसाद देत नागरिक व व्यापारी- व्यवसायकांनी विकेंड लौकडाऊन १०० टक्के पाळला. या लौकडाऊन मध्ये केवळ अत्यावश्यक सुविधा मात्र सुरू राहिल्या.

राज्यात फोफावत असलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काही दिवसापासून मिनी लौकडाऊनला सुरवात केली. तर शनिवार – रविवार या सुट्टीच्या दिवशी १०० टक्के लौकडाऊनची घोषणा केली. सगळीकडेच कोरोनाचा वाढता पार्दुभाव व रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या या लौकडाऊनला पाटण शहर व संपूर्ण तालुक्यात नागरिक, व्यापारी व व्यवसायकांनी चांगला प्रतिसाद दिला. या लौकडाऊन मधे अत्यावश्यक सेवा, आरोग्य यंत्रणा, मेडिकल फक्त सुरू ठेवण्यात आली. इतर सर्व व्यापारी, व्यवसायिक, भाजी मंडई, व्यापारी, व्यवसायिक, रिक्षा, खाजगी वाहतूक आदी सेवा पुर्ण बंद होत्या. तर नागरिकांनी देखील लौकडाऊन पाळुन शनिवार – रविवार घरातच राहणे पसंत केले. नागरिकांनी दाखविलेल्या या प्रतिसादाबद्दल प्रशासकीय यंत्रणा व पोलिस यंत्रणेने सर्वांचे आभार मानले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular