सातारा : गेल्या अनेक वर्षापासून पर्यावरण दृष्ट्या चर्चेत असणारा कासच्या कुंपणाचा तिढा अखेर सुटला असून आज 1 डिसेंबरच्या मुहूर्तावर कुंपणावर हातोडा पडला आहे. अचानक झालेल्ङ्मा या कारवाईने सर्वांनाच चकित केले.
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी व उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या या धडाकेबाज कारवाईने कासचा निसर्ग मोकळा डास घेणार असून वन्य प्राण्यांच्या संचारातील अडथळा अखेर जमीन दोस्त झाला आहे. आज सकाळीच जिल्हाधिकारी व उपवनसंरक्षक कास पठारावर आले. सोबत कास समितीचे कर्मचारी व वन विभागाचे कर्मचारी घेऊन ठीक दहा वाजता कुंपण काढण्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला.
गेल्या दहा वर्षांपूर्वी कास पठाराचे संरक्षण व्हावे यासाठी कास समिती व वन विभाग यांच्या पुढाकारातून कास पठारावर कुंपण घालण्यात आले. हे कुंपण घातल्यापासून पठारावरील फुलांचे प्रमाण कमी झाले तसेच येथील जैवविविधता धोययात येत असल्याचे अनेक तज्ज्ञांनी मत व्यक्त केले.गुरांची चराई बंद होवून गवताचे प्रमाण वाढल्याने फुले कमी झाली तर प्राण्यांच्या संचारातून, मलमुत्र विसर्जनातून मिळणारे खत बंद झाले. परिणामी फुलांची संख्या दिवसेंदिवस घटू लागली. जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून कास पठाराचे संवर्धन व परिसरातील पर्यटन वाढण्यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली. त्या दृष्टीने मध्यंतरी कास महोत्सवाचे ही आयोजन करण्यात आले. काही दिवसांपूर्वी कास पठार संवर्धनाच्या दृष्टीने वन विभागाने वनभवन सातारा येथे तज्ञांच्या बैठकीचे आयोजन करून कासच्या संवर्धनासाठी अभिप्राय घेतले.
या सर्वांच्या मागणीत कास पठार वरील कुंपण काढलेच पाहिजे असा एकंदरीत सूर होता. त्या दृष्टीने आज कोणतीही पूर्व सूचना न देता जिल्हाधिकारी व उपवनसंरक्षक यांनी ही मोहीम राबवली.यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, कास समिती व वन विभाग यांच्यामार्फत जाळी बसवली होती. सातार्यातील जनता व तज्ञ यांच्या मागणीतून जाळीमुळे फुलांवर दुष्परिणाम होत आहे. कास समिती वनविभाग मार्फत जाळी काढण्याचे काम सुरू केले असून कास पठारावर यापुढे सामाजिक तत्त्वांचा वावर वाढू नये यासाठी समितीमार्फत जास्त गार्ड ठेवण्यात येतील. कुंपण काढल्यामुळे हा वन्य प्राण्यांसाठी हा परिसर मोकळा होईल. पुढील हंगाम पूर्वीप्रमाणे चांगला होण्यासाठी या मोहिमेचा फायदा होईल. पुढील हंगामाच्या सुरुवातीला पर्यटनास सुरुवात झाल्यावर फुलांचे व पठाराचे संरक्षण करण्याकरिता तात्पुरती जाळी बसवण्यात येईल.
कासच्या कुंपणावर जिल्हाधिकार्यांच्या उपस्थितीत हातोडा
RELATED ARTICLES