कलेढोण-: (सतीश डोंगरे मायणी) येथील जागृत देवस्थान व भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या यल्लम्मा देवीच्या यात्रा उत्सवास आजपासून प्रारंभ होत आहे.शुक्रवार दि.१५ विशाखा नक्षत्रानुसार देवीच्या मंदिर परिसरात लिंब व नैवेद्याचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.शनिवार दि१६ अनुराधा नक्षत्रानुसार श्री यल्लम्मा देवीची भव्य मिरवणूक चांभार वाडा येथून सुरू होऊन बाजार चौकामधून मंदिराकडे पालखी प्रस्थान करणार आहे.देवीच्या सर्व धार्मिक विधी झाल्यानंतर सायंकाळी५ वाजता किचाचा(होम) कार्यक्रम होणार असल्याची माहिती यलम्मादेवी मंदिराचे पुजारी शिवाजी कारंडे यांनी दिली.देवीकडे श्रद्धा ठेवून मागणी केल्यास मनातील काम पूर्ण होते हे नवस फेडण्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाढत्या गर्दीवरून स्पष्ट होते यात्रा काळात पश्चिम महाराष्ट्रासह मुंबई पुणे व परराज्यातून हजारो भाविक दर्शनाकरिता उपस्थित राहतात.
कलेढोण येथे यल्लम्मा देवी यात्रेस प्रारंभ
RELATED ARTICLES