Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीमूळपीठनिवासिनी श्री यमाई मंदिर परिसर यात्रेमुळे फुलून गेला  

मूळपीठनिवासिनी श्री यमाई मंदिर परिसर यात्रेमुळे फुलून गेला  

औंध : औंध येथील श्रीयमाईदेवीच्या यात्रेनिमित औध गावच्या नजीकच्या उतरेकडील  पांढरकीच्या शिवारात व औंध ते पुसेगाव, खबालवाडी रस्त्याच्या दुतर्फा वेगवेगळे स्टाँल्स व दुकाने लावण्यात आली असून यात्रेकरू, भाविक, पर्यटक यांच्या गर्दीने यात्रा, ग्रामनिवासिनी, मूळपीठनिवासिनी श्रीयमाई मंदिर परिसर फुलून गेला असून यात्रेमध्ये आलेले गगनचुंबी पाळणे बालगोपाळ, तरूणाईच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे.
येथील ग्रामनिवासिनी श्रीयमाईदेवीच्या रथोत्सवानंतर श्रीयमाईदेवीची यात्रा पूर्ण बहरात आहे. औंध ग्रामपंचायत,औंध ग्रामस्थ, श्रीयमाई देवस्थान, कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या सहकार्याने ही जत्रा मागील अनेक दशकांपासून भरविली जात आहे.
यात्रेची परंपरा आजही तशीच आहे. पण दिवसेंदिवस यात्रेचे स्वरुप बदलत चालले आहे. पूर्वी   यात्रेच्या नाक्यावर   असणारे फोटो स्टुडिओ व अन्य दुकानांची यात्रेतील जागी आता आईस्क्रीम पार्लर, चायनीज दुकानांनी, स्वीट काँर्नर स्टाँलनी घेतल्याचे पाहावयास मिळते.
सध्या यात्रेमध्ये मेवामिठाईची दुकाने, लहान मुलांच्या खेळण्यांच्या साहित्य विक्रीचे महिलांच्या अलंकार विक्रीचे स्टाँल्सही आले असून यात्रेत भांडी साहित्य, ग्रहोपयोगी साहित्य विक्रीची अनेक छोटी मोठी दुकाने आली आहेत.
यात्रेमुळे भाविकांची गर्दी ही मागील आठ दिवसांपासून श्रीयमाई देवीच्या दर्शनासाठी वाढली आहे. राज्याच्या विविध भागांसह कर्नाटकासह अन्य भागातून भाविक येत आहेत. मूळपीठ देवीच्या दर्शनाबरोबरच भाविक, पर्यटक येथील श्री भवानी चित्रसंग्रहालय, ऐतिहासिक पाण्याची तळी, पवनचक्या तसेच सोलर प्लँटला ही भेट देत आहेत. भाविकांच्या स्वागतासाठी प्रसादाचे स्टाँल्सही ठिकठिकाणी लावले आहेत.
यात्रेमध्ये ही औंध पंचक्रोशितील रहिवाशांबरोबर विविध भागातून यात्रेकरू आले आहेत. आर्थिक उलाढाल होऊ लागल्याने यात्रेमध्ये मागील तीन दिवसांपासून खरेदी विक्री चांगल्या पध्दतीने होऊ लागली असून गृहोपयोगी, गरजेच्या जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीस महिला वर्ग, खरेदीदारांची गर्दी होऊ लागली आहे.यात्रेमुळे औंध नगरीमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण असून घरोघरी पाव्हुण्यारावळयांची, मित्रमंडळींची मोठी रेलचेल आहे.
यात्रेकरु, व्यापारी, व्यावसायिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून औंध ग्रामपंचायत, ग्रामस्थांच्यावतीने पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा यांचे चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात आले आहे. औंध पोलिसांनी ही यात्रेमध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular