पाटण:- महिलांची दु:ख, महिलांच्या अंतर मनातील वेदना, जाणून निराधार महिलांचा आधार वड बणून त्यांना जगण्याची नवी दिशा देणारी “मायेची साऊली” सौ. आयेशा इकबाल सय्यद (भाभी) यांना ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त यशवंत नगरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, व्रुत्त निवेदनक उदय निरगुडकर, सातारा जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते प्रधान करण्यात आला.
यावेळी सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे, कराड अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी, प्राना फौंडेशनच्या अधक्ष्या प्राची पाटील, प्रा. अशोक चव्हाण, पत्रकार गोरख तावरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कराड येथे अर्बन बँकेच्या मुख्य कार्यालय येथील शताब्दी सभागृहात जागतिक महिला दिनाच्या पुर्व संधेला यशवंत नगरी पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात यशवंत जिवन गौरव आदर्श माता पुरस्काराने सौ. कांताताई मुलचंद डोंगरे यांना सन्मानित करण्यात आले. तर विविध क्षेत्रात नावलौकीक झालेल्या इतर पंधरा महिलांना यशवंत नगरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील म्हणाले. कर्तृत्ववान महिला या खऱ्या जिजाऊ आणि सावित्रीच्या लेखी आहेत. सावित्रीबाईंनी महिला शिक्षणाची मुहूर्तमोड रोवताना समाजाची निंदा-चेष्टा सहन केली. जिजाऊंच्या कर्तृत्वाचे धाडस आणि आदर्श मनात ठेवून महिला शिक्षणाचे काम अखंडीत ठेवले. यांच्या आदर्श घेऊनच महिला दीनाच्या पुर्वसंदेला यशवंत नगरी पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या महिला या आजच्या जिजाऊ आणि सावित्रीबाई आहेत.
गरीब असो अथवा श्रीमंत असो, वयोवृद्ध असो अथवा निराधार महिला असो, अशा महिलांच्या संकटाला धाऊन जाणाऱ्या त्यांचा आधार वड बनणाऱ्या आयेशा सय्यद (भाभी) तशा गेली ३५ वर्षे राजकारणाशी निगडित असल्या तरी राजकारणापेक्षा त्यांचा खरा वेळ हा महिलांच्या अडीअडचणी सोडविण्यातच जातो. मदतीसाठी भाभीच्यां दारात आलेली महिला कधी रीकाम्या हाताने मागे गेली नाही. अनेक महिलांचे सासरच्या अथवा नवऱ्याच्या जाचाला कंटाळून मोडणारे किंवा इतर कारणाने उधवस्त होणारे संसार भाभींनी पूर्वपदावर आनुन पुन्हा उभे केले. विधवा वयोवृद्ध निराधार महिलांना संजयगांधी निराधार योजनेतून अर्थिक सहाय्य पेंशन सुरू करून हजारो महिलांना जगण्याची नवी अशा निर्माण करून दिली. भाभी या कधी राजकीय अथवा शासकीय पदावर असो किंवा नसो त्यांनी अशा गरजू महिलांविषयी कार्यतत्पर ठेवले आहे. सद्या भाभीचें माहेर महिला आधार केंद्राच्या माध्यमातून महिला सबलीकरण कार्य सुरू असून त्या सातारा जिल्हा भाजपाच्या महिला मोर्चा उपाध्यक्ष आहेत. पाटण तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्य पदी कार्यरत आहेत. तर पाटण पोलिस स्टेशनच्या महिला दक्षता समितीवर सदस्य म्हणून काम पहात आहेत. अशा विविध क्षेत्रामध्ये वैशिष्ट्यपूर्ण योगदान भाभींनी दिले आहे. भाभीच्यां या कार्याचा महिला दिनाचे औचित्य साधून सन्मान झाला असताना. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.