साताराः यशोदा टेक्नीकल कॅम्पस, सातारा यांच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या वतीने शिवाजी विद्यापीठ लीड कॉलेज योजने अंतर्गत 7 जानेवारी ते 12 जानेवारी 2019 या दरम्यान सहादिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पी.सी.बी. डिझायनिंग अॅण्ड हॅण्डस ऑन आरडीनो आय.ओ.टी. हा कार्यशाळेचा विषय होता. या कार्यशाळेसाठी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणारे इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड टेलिकम्युनिकेशन व ईलेक्ट्रिकल विभागाच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे नव-नवीन प्रोजेक्ट करावे लागतात. त्यामुळे त्यासाठी आवश्यक असणारी हार्डवेअर व सॉफ्टवेअर कशी बनविली जातात याबाबत माहिती असणे आवश्यक असते. या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना या संदर्भात माहिती देण्यात आली. त्यामुळे ते स्वतः प्रोजेक्ट किवा नवनवीन उपकरणे बनवू शकतील. विद्यार्थ्यांनी बनविलेल्या नवनवीन प्रोजेक्ट व उपकरणांचा दैनदिंन जीवनात असलेला वापर याबाबतजेनेसिस इन्स्टिट्युट, साताराचे प्रा. जगताप सरयांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळा यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. दशरथ सगरे, उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे, संचालक प्रा. डॉ. एन.जी. नार्वे, विभाग प्रमुख प्रा. जे. एच. पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली. कार्यशाळेच्या प्रमुख म्हणून प्रा. एस. एम. कंडारकर यांनी काम पहिले.
यशोदा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सातारा येथे सहा दिवसीय कार्यशाळा
RELATED ARTICLES