वाईः धकाधकीच्या जीवनात आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. हवा, पाणी, अन्न दुषीत झाले आहे. त्यामुळे लहान मुलांपासून मोठया व्यक्तींना गंभीर आजार होताना दिसत आहे.आपल्या जीवनात जसे मुलभुत गरजांना महत्व तसेच निरोगी आरोग्याला ही अनन्य साधारण महत्व आहे. आरोग्य निरोगी राखण्यासाठी उत्साही जीवन जगण्यासाठी शरीराला योगा-प्राणायामची गरजेचे आहे. त्यामुळे योगाला आपल्या जीवनात मुलभुत गरजेप्रमाणे योगाचा समावेश केल्यास निरोगी व उत्साही जीवन जगू शकतो. विदयार्थ्यांनी नियमित योगा केल्यास बृध्दी तल्लक होऊन निरोगी उत्साही जीवन झाल्याने शिक्षणात यशस्वी होऊन उत्तम करिअर करू शकता. असे उदगार पंतजलि योगसमितीचे योगशिक्षक धनंजय मलटणे यांनी न्यु इंग्लिश स्कूल बोरगांव येथे उन्हाळी शिबिरात विद्यार्थ्यांसाठी आयोजित योगशिबिरात मार्गदर्शन करताना काढले. यावेळी योगशिक्षक सुभाष यादव,पी.एस.भिलारे,अजित वाडकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिबिरात मार्गदर्शन करताना योगशिक्षक सुभाष यादव म्हणाले की, स्पर्धेच्या युगात विदयार्थी आरोग्याकडे, आहाराकडे गांर्भीयाने लक्ष देत नाहीत त्यामुळे आजारपणाला सामोरे जावे लागते. हे टाळण्यासाठी योगाला आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनवून नियमित योगा-प्राणायाम केल्यास निरोगी व सुखी जीवन जगू शकतो.कारण निरोगी आरोग्य ही यशस्वी करिअरची गुरूकिल्ली आहे. शिबिरात न्यु इग्लिंश स्कूल बोरगांवचे 100विद्यार्थिनी व विदयार्थ्यांनी सहभाग घेतला. दहा दिवसीय उन्हाळी शिबिरात अनेक साहसी खेळ, विविध प्रकारची अंगी असावी लागणारी कौशल्ये शिकवल्याची माहिती प्रशिक्षक अजित वाडकर यांनी दिली. यावेळी योग प्रशिक्षकांनी विदयार्थ्यांना योगा-प्राणायामचे प्रात्याक्षिक करत मार्गदर्शन केले. शिबिरास विद्यार्थी मोठया संख्येने होते.
योगाला आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक केल्यास निरोगी आयुष्य शक्य :धनंजय मलटणे
RELATED ARTICLES