साताराः एखाद्या नव्या बांधकाम व्यावसायिकाला आपल्या व्यवसायात कोणते प्रसंग,व्यक्तीमत्वे येतात, त्यांच्या पासून कसा त्रासही होतेा आणि सहकार्यही होते याचे सर्वांग सुंदर दर्शन घडवणारा जीवनपटाचे उत्तम उदाहरण म्हणजे ही योगायोग कादंबरी आहे.असे उदगार ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक व मॉडेल डेव्हलपर्सचे संचालक सतीश गिजरे यांनी काढले.
येथील ज्येष्ठ लेखक आणि बँकर दिलीप वासुदेव पाठक यांनी लिहिलेल्या तिसर्या पुस्तकाचे प्रकाशन येथील श्री.छ.प्रतापसिंह महाराज (थोरले) नगरवाचनालयाच्या पाठक हॉल येथे नुकतेच संपन्न झाले त्यावेळी बोलताना सतीश गिेजरे यांनी वरील उद्गार काढले
या कायर्ंक्रमासाठी सातारा येथील बांधकाम क्षेत्रातील एक विश्वसनीय नांव असणार्या मॉडेल डेव्हलपर्सचे संचालक विजयराव आगटे व सतीश गिजरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच ज्येष्ठ करसल्लागार अरुण गोडबोले ,नगरवाचनालयाचे अध्यक्ष युवराज पवार , लेखक दिलीप पाठक यांची व्यासपीठावर पमुख उपस्थिती होती..
मान्यवरांचे हस्ते दिप प्रर्जंवलन आणि सरस्वती देवीचे प्रतिमेचे पुजन झाल्यावर नगरवाचनालयाचे वतीने प्रास्ताविक डॉ.ज्योत्सना कोल्हटकर यांनी करताना वाचनालयाच्या विविध अंगी सेवा भावी उपक्रमांची तसेच वाचन संस्कृती वाढीस लागावी यासाठी केलेल्या आणि सुरु असलेल्या उपक्रमाची माहिती दिली.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना दिलीप पाठक म्हणाले की, आपल्या जीवनातील अनुभवावरील काही गप्पा काही गोष्टी हे पहिले पुस्तक मी लिहीले, त्यानंतर विथ नो गॉडफादर ही कल्पनेवर आधारीत कादंबरी गेल्या वर्षी प्रकाशित झाली. त्यापैकी विथ नो गाडफादर या कादंबरीला महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला. लिखाणाची आवड अन् पुरस्कारातून मिळालेली प्रेरणा स्वस्थ बसून देत नव्हती. यातूनच योगायोग या तिसल्या पुस्तकाची निर्मिती होत आहे.एका बांधकाम व्यावसायिकाच्या जीवनातील स्थित्यंतरे या लेखनात आपण दिली असू आपणाला हे पुस्तक निश्चितच आवडेल .
पाठक यांचे मेहुणे गोविंदराव देखणे यांनी यावेळी पाठक यांच्या विषयी बोलताना एखादी गोष्ट रंगवून सांगण्याची कला दिलीप पाठक यांना अतिशय सुरेख असून लेखनासाठी त्यांनी निवृत्तीनंतर केलेली चिकाटीने सरुवात खरोखरच आदर्श आहे. गोष्टी वेल्हाळपणा आणि त्याच्या पुस्तकात असणारी घटना, पात्रे आणि स्थळांची भाउ गर्दी प्रत्येक वाचकाला भावणारीच ठरत आहेत.ही बांधकाम व्यावायिकाची कादंबरीही नक्कीच वाचकांच्या पसंतीस उतरेल असे सांगितले.
प्रकाशक या नात्याने आपले मनोगत व्यक्त करताना कौशिक प्रकाशनचे अरुण गोडबोले म्हणाले की, एखाद्या इंग्रजी कादंबरीला शाभेल अशी ही लेखनशैली असून गाठ, निरगाठ आणि त्याची उकल असे सुत्र बांधताना सर्वगाठी कादंबरीच्या शेवटी उकलत पाठक यांनी विविध प्रकारचे प्रसंग, पात्रे आणि घटनांचा एक चित्रपटच यात उतरवला आहे. माझा आणि पाठक यांचा वेस्टर्नं ट्रस्टीच्या माध्यमातुन संबध आला आणि तो दृढ होत गेला. मागील वर्षी त्यांच्या दुसर्या पुस्तकाला मिळालेला राज्य पातळीवरील पुरस्कार हा एका सातारकर लेखकाचा सन्मान याचा मोठा आनंद वाटतो.
समारंभाचे सुत्र संचालन अभय देवरे यांनी केले.
समारंभास कराड अर्बॅन बॅकेंचे कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी,अमरसिंह पाटणकर,डॉ दत्तप्रसाद दाभोलकर,प्राचार्य पुरुषोत्तम शेठ,आनंदा ननावरे,मानसी माचे, मानसी पतकी, दादा निगडीकर, भाकरे.बबनराव देशपांडे, भंडारे,किरण जोशी,विश्वास पाठक,श्रीधर क्षीरसागर, गौतम भोसले,सुभाष सरदेशमुख, पत्रकार अतुल देशपांडे,अनील काटदरे,दिपक खांडके,सौ.पाठक, सौ.देशपांडे,तसेच पाठक याचे नातलग व विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती होती.
योगायोग कादंबरी ही बांधकाम व्यावसायिकांचा जणू जीवनपटचः सतीश गिजरे
RELATED ARTICLES