साताराः सातारा शाहुनगर येथील गुरूकुल स्कूलच्या योग प्रशिक्षिका सौ. उमा चौगुले यांना सहकार महर्षि कै. विष्णु आण्णा पाटील यांचे स्मरणार्थ विश्वयोग दर्शन केंद्र मिरज व पतंजली योग समिती, सांगली यांचे वतीने राज्यस्तरीय योगभूषण पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. याबद्दल गुरूकुल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. राजेंद्र चोरगे यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी मुख्याध्यापिका सौ. शीला वेल्हाळ, जनसंपर्क अधिकारी विश्वनाथ फरांदे , पर्यवेक्षक मोहन बेदरकर, सेकंडरी विभागाच्या इनचार्ज सौ. सोनाली तांबोळी, पुर्व प्राथमिक विभागाच्या इनचार्ज सौ. अनुराधा कदम उपस्थित होते.
मानपत्र, शाल, श्रीफळ व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते. गेल्या 20 वर्षात योगक्षेत्रामध्ये उत्तुंग यश मिळविलेल्या सौ. उमा चौगुले यांनी संपुर्ण महाराष्ट्रात योगप्रचाराचे कार्य करून अनेक योगशिक्षक , योगसाधक, आंतरराष्ट्रीय योगपटु तयार केले आहेत.
या कार्याबद्दल त्यांना या अतिशय मानाच्या योगभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. सांगली येथे 11 फेब्रुवारी 2018 रोजी झालेल्या पुरस्कार वितरण सोहळयात सांगली जिल्हयाचे प्रमुख सत्र न्यायाधिश व्ही. जी. बिष्ट यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान केला तर श्रीमती जयश्रीताई मदनदादा पाटील, डॉ. मुकुंद पाठक, योगविशारद बाळकृष्ण चिटणीस आदि. मान्यवर उपस्थित होते.
पुढील वाटचालीस सौ. उमा चौगुले यांना आनंद गुरव, मधुकर जाधव, अॅड. राजेंद्र बहुलेकर, नितीन माने, संजय कदम, उदय गुजर, दिपक मेथा, जगदिश खंडेलवाल सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या.
गुरूकुल स्कूलच्या योगप्रशिक्षिका उमा चौगुले यांना योगभूषण पुरस्कार
RELATED ARTICLES