Wednesday, June 25, 2025
Homeताज्या घडामोडीअखेर युवकांनीच हाती घेतल्या कुर्‍हाडी

अखेर युवकांनीच हाती घेतल्या कुर्‍हाडी

वडूज : वडूज – दहिवडी रस्त्यावर हुतात्मा हायस्कुल नजीक एक-दोन वडाच्या झाडाच्या फांद्या खुपच खाली आल्या होत्या. त्या लोंबकळणार्‍या फांद्यांमुळे अनेकवेळा छोटे-मोठे अपघात होत होते. या अपघातामुळे काही लोक जखमी होण्याबरोबर वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होते. ही बाब संबंधित खात्याच्या कानावर होती. मात्र त्यांच्याकडून जाणीवपूर्वक उपाय योजना होत नव्हती.
या फांद्यांबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस यंत्रणेकडून सत्वर कार्यवाहीची अपेक्षा होती. मात्र बांधकाम खात्याला आजारपणामुळे जनतेच्या समस्येकडे लक्ष देता येत नाही. तर हे काम बांधकाम विभागाचे आहे. अपघात झाला काय ? अनं न झाला काय ? या गांवचे आपण कोणीच नाही. या अर्विभावात पोलीस खाते आहे. शिवाय अपघात झाला तरी एक प्रकारे खात्याचाच फायदा या भावनेने त्यांनी सोयिस्कर या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष केले होते. अश्या परस्थितीत सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार शिंदे, लालासाहेब गोडसे, रोहित राजमाने, दिपक भाट, समीर मुलाणी या युवकांनी एकत्र येवन स्वत: कुर्‍हाड हातात घेवून त्या फांद्या तोडून प्रवाशी व वाहन धारकांच्या वर आलेले टांगते संकट दूर केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular