Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीजि. प. च्या शिक्षकांमुळे माण पॅटर्न तयार झाला : संजीवराजे

जि. प. च्या शिक्षकांमुळे माण पॅटर्न तयार झाला : संजीवराजे

म्हसवड : सातारा जिल्ह्यात माण तालुक्याची शैक्षणिक परंपरा अतिशय उज्ज्वल असून हे केवळ जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या मूळे शक्य झाले असून यातून शिष्यवृत्ती मध्ये माण पॅटर्न तयार झाल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी गोंदवले खुर्द येतील तालुकास्तरीय शिक्षक आढावा बैठकीत केले.
गोंदवले खुर्द येतील विश्वछाया मंगल कार्यालयात माण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीत आढावा बैठक आयोजीत केली होती प्रथम सरस्वती पुजनाने या कार्यक्रमाला सुरूवात झाली यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर,अर्थ शिक्षण समितीचे सभापती श्री राजेश पवार,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुभाष नरळे,शिक्षणाधिकारी श्री हणमंत जाधव साहेब,माण तालुक्याचे सभापती रमेश पाटोळे,उपसभापती नितीन राजगे,जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे, गट विकास अधिकारी श्री गोरख शेलार,प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्री बी.बी चौगले,शिक्षणविस्तार अधिकारी संगीता गायकवाड यांच्या सह तालुक्यातील सर्व शिक्षक उपस्तीत होते.
यावेळी संजीवराजे नाईक निंबाळकर पुढे म्हणाले,सर्व सामान्य लोकांच्या मुलांना शिक्षणाची दारे महात्मा फुले यांनी खुली करून दिली त्याच बरोबर शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपल्या रयत शिक्षण संस्थेचा विस्तार सातारा जिल्ह्यातुन केला.शिक्षणा बाबत आस्था असणारी शी थोर रत्ने जिल्ह्यात होऊन गेली.यांनी सुरू केलीली शैक्षणिक परंपरा जपण्याच काम आपल्याला करायचं आहे.आज जिल्ह्याचा विचार केल्यास सर्वत्र खासगी शाळांची वाढ होत असून या ठिकाणी पालकांना पैसे भरून प्रवेश घ्यावा लागत आहे.हे सर्वसामान्य लोकांना परवडणारे नाही.यामुळे सर्वसामान्य मुलांना जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घ्यावा लागत असतो.अनेक वेळा ज्या मुलाला शिकायचं नाही किंवा त्याच्या पालकांना ही त्याला शिकवायचं नाही अशी मूले आमच्या जिल्हा परिषद शाळेत दाखल केली जातात.ही मुलं या शिक्षकांच्या स्वाधीन करून त्यांना ती मुलं घडवावी लागतात,या दुष्काळी माण तालुक्यातील अनेक रत्ने जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन सध्या राज्याचा कारभार सांभाळत आहेत माण ही रत्नांची खान आहे.या ठिकाणच्या गट विकास अधिकारी,प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांनी पुस्तकी शिक्षणा सह खेळ,उद्योग,व्यवहारी गोष्टींवर देखील भर देत सर्व शिक्षकांच्या मध्ये समन्वय ठेवून शाळांचा दर्जा चांगला केला यामुळे माण तालुक्यातील आदर्श शिक्षण प्रणाली उदयाला येत आहे प्रामुख्याने हे काम सगळ्या सातारा जिल्ह्यात आदर्श असून त्याचा इतरांनी आदर्श घ्यावा व हे काम असच पुढं चालावे यासाठी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी आणि त्यांच्या सर्व टीमला त्यांनी धन्यवाद दिले. शिक्षण सभापती राजेश पवार पुढे म्हणाले माण तालुक्या सह सातारा जिल्ह्यात शाळांचा दर्जा दिवसेंदिवस वाढत असून सध्या काही प्रमाणात रिक्त जागांची ऊनीव नक्की आहे पण आमच्या अधिकार्‍यांनी त्यावर मात करत हे कार्य पुढे सुरू ठेवले आहे.
या बद्दल त्यांना धन्यवाद दिले शिक्षकांच्या हातात नवीन पिढीचे भवितव्य घडवण्याचे महत्त्वाचे काम असून ते चोख पणे हे काम करत आहेत म्हणून आमच्या माण तालुक्यात अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण झाले.हे खेळाडू जेव्हा स्पर्धेत प्रत्यक्ष सहभागी होतात तेव्हा आमचा उर अभिमानाने भरून येतो ललिता बाबर,किरण भगत या सारखे खेळाडू जिल्हा परिषद शाळेत तयार झाले ही मोठी कौतुक करण्यासाखी बाब आहे.
यावेळी अरुण गोरे, रमेश पाटोळे,यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे निवेदन हणमंत जगदाळे यांनी केले तर आभार विस्तार अधिकारी संगीत गायकवाड यानी मानले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular