Thursday, June 19, 2025
Homeसातारा जिल्हाजावळीझाडाणी प्रकरणात संबंधितांना २९ जुलैला शेवटची संधी ; कागदपत्रे, म्हणणे मांडण्यासाठी...

झाडाणी प्रकरणात संबंधितांना २९ जुलैला शेवटची संधी ; कागदपत्रे, म्हणणे मांडण्यासाठी मुदत

सातारा / प्रतिनिधी :- सहयाद्री वाचवा मोहीमेतंर्गत सामाजिक, माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी उघडकीस आणलेले झाडाणी प्रकरण सध्या चांगलेच गाजत आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनात याविषयी खडाजंगी चर्चा झाल्यानंतर गुरुवारी अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी नोटीस बजावलेले संबंधित हजर होते. यावेळी संबंधितांनी म्हणणे मांडले आणि काही कागदपत्रे दिली आणि उर्वरित कागदपत्र सादर करण्यासाठी आणखी मुदत देण्याची मागणी केली. त्यावर अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी दि.२९ जुलै ही तारीख देत ही म्हणणे मांडण्यासाठी आणि कागदपत्रे सादर करण्यासाठी शेवटची संधी असल्याचे सांगितले.

झाडाणी (ता. महाबळेश्वर) येथील तब्बल 640 एकर जमीन जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी आणि त्यांच्या नातेवाईकांनी बळकावल्याचे कागदपत्रांवरुन स्पष्ट झाले होते. याप्रकरणी पहिल्यांदा तिघांना आणि नंतर आठ जणांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. आज झालेल्या सुनावणी वेळी जीएसटी आयुक्त चंद्रकांत वळवी, अनिल वसावे, संगीता वळवी , अरमान वळवी, यांच्यासह संबंधित उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपले म्हणणे मांडले आणि काही कागदपत्रे सादर केली परंतु अजून काही कागदपत्र सादर करण्यासाठी मुदत मागितली असता अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी २९ जुलै ही तारीख देत ही शेवटची संधी असून त्यावेळेस संबंधित सर्व कागदपत्रे आणि म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular