मायणी :- महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास मंत्री मा पंकजाताई मुंढे यांनी खास बाब म्हणून मायणी जि. प. गटासाठी तब्बल एक कोटी बत्तीस लाख रुपयांचा निधी विविध विकासकामांसाठी मजूर केला आहे , अशी माहिती युवानेते सचिनभाऊ गुदगे यांनी दिली .
ते मायणी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते , यावेळी मार्केट कमिटीचे माजी सभापती सोमनाथ यांची उपस्थिती होती.
यावेळी सचिनभाऊ गुदगे पुढे बोलताना म्हणाले की , मायणी गावासह संपूर्ण जि प गटात सध्या कोट्यवधींचीकामे होणार असून यापुढे जनतेला आमदार किंवा जि. प.सदस्यांची उणीव भासू देणार नाही . मा.ना.पंकजाताई मुंडे यांनी खास बाब म्हणून पूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये फक्त मायणी जि. प.गटासाठी माझ्या आग्रही मागणीनुसार मायणीसाठी ८७ लाख व इतर गावासाठी ४५ लाख असा एकूण १कोटी३२लाखांचा निधी शासनाच्या २५-१५ या शीर्षकाखाली मंजूर केला आहे. या निधी पैकी २५लाख रुपये तातडीने जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आले आहेत .यामध्ये पाचवड येथे जोतिबा मंदिर कंपाउंड,बंदिस्त गटर,व अंतर्गत रास्ता काँक्रीटीकरण यासाठी ९लाख , मोराळे येथील रामोशी समाज मंदिर, बंदिस्त गटर,व अंतर्गत रास्ता काँक्रीटीकरण यासाठी ९लाख, अनफळे येथील बंदिस्त गटर , अंतर्गत रास्ता काँक्रीटीकरण यासाठी ५लाख व मायणी येथील यलमरवस्ती हायमोस पोल यासाठी २ लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे.
ही सर्व कामे ३१ मार्च २०१९ पूर्वी पूर्ण करण्याचा आदेश संबंधित विभागाला देण्यात आला आहे.
याप्रमाणेच उर्वरित निधीही मा ना पंकजाताई मुंढे यांच्या ग्रामविकास खात्या कडून लवकरच वर्ग होणार असून लवकरच उर्वरित कामांनाही गती येणार असल्याचेही सचिनभाऊ गुदगे यांनी सांगितले .