उच्च न्यायालयात हेमंत पाटील यांची जनहित याचिका दाखल
मुंबई : कमळ राष्ट्रीय फूल असल्याने ते कोणत्याही पक्षाचे चिन्ह असू शकत नाही. त्यामुळे भाजपाला पक्षचिन्ह म्हणून देण्यात आलेले कमळरद्द करण्यात यावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
भाजपा निवडणूक लढवण्यासाठी कमळाचा वापर करून एम्ब्लेम्स अॅण्ड नेम्स (प्रिव्हेन्शन ऑफ इम्प्रॉपर युझ) अॅक्ट, 1950 चे उल्लंघन करत आहे, असा आरोप याचिकेद्वारे करण्यात आला आहे.
भारतीय संस्कृतीत कमळ हे पवित्र व शुभ मानले जाते. कमळ हे लक्ष्मी देवीचे फूल मानले जाते, असे सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी जनहित याचिकेत म्हटले आहे. कमळ हे शुद्धतेचे, यश, उदंड आयुष्याचे प्रतीक आहे. त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकत नाही, असे याचिकेत म्हटले आहे.
भाजपाचे निवडणूक चिन्ह कमळ रद्द करण्यात यावे.आयोगाकडे निवेदन केले.