म्हसवड : जम्मु काश्मिर मधील उरीमध्ये रविवारी भारतीय लष्कराच्या तळावर झालेल्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यात 17 जवान शहीद झाले आहेत यामध्ये जाशी ता. माण येथील लान्स नायक असलेले चंद्रकांत शंकर गलांडे ( वय 29 ) शहिद झाले आहेत त्यांच्या पश्चात पत्नी निशा (वय 25) दोन मुले श्रेयश (वय 4) जय (वय 9 महिने) असुन जाशी गावा सह संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे चंद्रकांत यांचे पार्थिव आज दिनांक 20 रोजी सकाळी आठ वाजता येणार असुन लष्करी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत त्यावेळी त्यांची पत्नी निशा यांनी बोलताना सांगितले की, पाकिस्तानला धडा शिकवा अशी आर्त हाक दिली यावेळी जाशी गावात कडकडीत बंद पाळण्यात आला आणि शाळा बंद ठेवण्यात आल्या.
भारतीय सैन्य दलात 2004 साली लान्स नायक म्हणून ते रूजु झाले होते सध्या ते जम्मु काश्मीर मधील उरी येथे सेवा बजावत असताना रविवारी भारतीय लष्कराच्या तळावर झालेल्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यात 17 जवान शहीद झाले. या शहीद जवानांमध्ये लान्स नायक चंद्रकांत गलांडे हे शहिद झाले.
काश्मीर खोर्यात प्रत्यक्ष सीमारेषेपासून जवळच असलेल्या उरी शहरातील भारतीय लष्कराच्या एका तळात घुसून रविवारी आत्मघाती सशस्त्र दहशतवाद्यांनी हल्ला केला 17 जवान शहीद झाले.
प्राणहानीच्या दृष्टीने अलीकडच्या काळातील लष्करी तळावरील हा सर्वांत भीषण हल्ला होता. यात ते जखमी झाले होते उपचारा दरम्यान ते मृत्यू मुखी झाला हे वृत्त सोमवारी सकाळी 7 वाजता जाशी गावात समजताच गाव बंद ठेवण्यात आले आणि तालुक्यातुन चंद्रकांत यांच्या घरी लोकांनी गर्दी केली होती आसपासच्या गावात फ्लेक्स लावण्यात आले होते त्यांचे केशव आणि मंजाबापु हे दोन्ही भाऊ हे पण लष्करी सेवेत असून केशव हे मोठे भाऊ असून ते जम्मू येथे तर मंजाबापु हे पंजाब येथे सेवा बजावतात चंद्रकांत हे गेल्या दोन महिन्या पुर्वी ते सुट्टी वर आले होते. त्यांचा छोटा मुलगा जय याचा पहिला वाढदिवस 21 डिसेंबर रोजी होता त्यासाठी ते सुटीवर येणार होते मात्र नियतीने त्यांच्या वर घात केला त्यांचे प्राथमिक शिक्षण जाशी गावी झाले जाशी गावी माध्यमिक शाळा नसल्याने पळशी येथे हनुमान विद्यालयात माध्यमीक शिक्षण पुर्ण केले त्यांना पोलीस मध्ये जाण्याची खुप ईच्छा होती मात्र ते मिलटरी मध्ये 2004 मध्ये लान्स नायक म्हणून भरती झाले होते त्याचा गावामध्ये चांगला संपर्क होता ते मनमिळावू स्वभावाचे होते त्यांचा विवाह 21 नोव्हेंबर 2011 रोजी माळवाडी (म्हसवड) येथील उत्तमराव ढेंगील यांची कन्या निशा हिच्याशी विवाह जाशी गावात झाला होता त्यांना शेतीची खुप आवड होती त्यांनी काही वर्षा पुर्वी शेतीसाठी ट्रॅक्टर घेतला होता ते गावी आल्यानंतर शेतीचे कामे करत असत.